धक्कादायक : अगदी क्षुल्लक कारणावरून वाद जुंपले; वस्तऱ्याने केले तब्बल एवढे वार. पहा बातमी सविस्तर.
दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या बातम्या वाढत आहेत. रोज काही ना काही बातमी कानावरती येत असते. या सगळ्यांमध्ये तरुण हे वाईट वळणाला लागतात. मोठ्या प्रमाणात हल्ले होतात त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणात वाढ झाली. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अगदी शुल्लक कारणावरनं एका युवकावरती जीवघेणा हल्ला झाला. महाराष्ट्रात अराजकतेच्या प्रचंड घटनांमध्ये वाढल्या आहेत.
अनेकांकडे संयम राहिलेला नाही अतिशय शुल्लक कारणावरून काही जण एकमेकांवरती चालून जातात भांडण करतात. आणि प्रसंगी एकमेकांसोबत हाणामारी देखील करतात. या घटनांमुळे गुन्हेगारांच्या प्रमाणात वाढ झाली. हाणामारी च्या घटनांतून काहीतरी विपरीत घडण्याची देखील शक्यता असते. यातून एखादी व्यक्ती गंभीर जखमी होऊ शकते किंवा मृत्युमुखी देखील पडू शकते. यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते, पण तरीही काही घटना घडताना पाहायला मिळतात.
खामगाव शहरात अगदी शुल्लक कारणावर एका युवकावरती जीव घेणा हल्ला झाला. त्यामध्ये एका युवकाच्या मानेवरती धारदार वस्त्यऱ्याने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये एका युवकाच्या मानेवरती एक ना दोन तब्बल १७ वेळा वार झालेत. त्याच्या कानाला मोठी इजा झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अगदी किरकोळ अशी कारवाई केली आहे. असा आरोप या युवकाचे नातेवाईक करतात.
या घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत. मात्र पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केलेला नाही. मोठ्या जीवघेना हल्ल्यानंतर ३०७ सारखे गुन्हे दाखल का केले नाही म्हणून कुटुंबीयांसह पोलीस स्टेशनला हेलपाटे मारले जात आहेत. पण काहीच उपयोग होत नाही कारण आरोपी अजून अटक सुद्धा नाही. त्यामुळे युवक आणि त्याचे नातेवाईकांकडून पोलिसांवर रोष व्यक्त केला जातो. अगदी किरकोळ कारणातून जर एवढ्या मोठ्या गोष्टी घडत असतील तर नेमकं आता सुरक्षितता कुठे आहे हा सवाल उपस्थिती राहतो.