” त्या ” दोघींना घेऊन बाप्पा अवतरले ! पाहून झाले चकित सारे !! पहा बातमी सविस्तर
मूर्तिकार प्रफुल्ल लाटणे यांचा सामाजिक उपक्रम.
” गणपती बाप्पा मोरया, यांचा जयघोष करत लाडके बाप्पा आता विराजमान झाले आहेत. घरोघरी सार्वजनिक ठिकाणी शहरातील विविध मंडळांमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. गणेशोत्सवामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांमध्ये भव्य देखावे आणि सुंदर अशोक गणेशमूर्तीची स्थापन झाली आहे.
नगर शहरात मोठया प्रमाणात गणेश मूर्ती बनवण्याचे कारखाने आहे. लहान-मोठ्या सर्व प्रकारचे गणेशमूर्त्या कारखान्यांमध्ये तयार केल्या जातात. यातच कल्याण रोडवरील स्वप्निल आर्ट गॅलरी या कारखान्यांचे खास वैशिष्ट्य आहे. मूर्तिकार प्रफुल लाटणे यांची एक वेगळी ओळख आहे उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून ते अनेक स्पर्धांमध्ये विजेते आहेत. शहरातील मोठमोठ्या मंडळांसाठी भव्य गणेश मुर्ती तयार करण्यात त्यांचा हातखंड आहे.
त्यामूळे जिल्हा सह इतर जिल्ह्यातून त्यांच्याकडे मोठी मागणी असते. आपल्या सर्व कारागीर यांच्या सोबत वर्ष भर मेहनत करून अखेर गणेशोत्सव धुमधडाक्यात केला जातो. मूर्तिकार प्रफुल्ल लाटणे हे आपल्या इथे असणाऱ्या मूर्तींमधून काही ना काही सामाजिक संदेश देणं ही त्यांची आजवरची परंपरा राहिली आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षी देखील त्यांनी आपल्या देशातील दोन महान नारीशक्तीचा सन्मान कृतज्ञता व्यक्त करत केला
गाणं कोकिळा स्वर सम्रागिनी लता मंगेशकर आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मूर्तींना साकारत समवेत बालगणेश या माध्यमातून मूर्तिकार यांना आदरांजली अर्पण केली. ह्या उत्सवा निम्मित त्यांचं स्मरण सर्वांना व्हावं यासाठी आपण हे सादर केल असे यावेळी मूर्तिकार म्हणाले. माईंच्या हातात एक लहान बाळ आहे,सुप्रसिद्ध स्वररत्न लता मंगेशकर यांची हुबेहूब मूर्ती घडवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वप्निल आर्ट गॅलरी यांनी आदरांजली अर्पण केली.