Breaking News: सोयगाव तालुक्यात लम्पी आजाराचा शिरकाव, आजाराची लागण होऊन बैल दगावला.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि.. १४ देशभरात लम्पी या आजाराने थैमान घातले असून पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे लम्पी या आजारावर अद्यापही तालुक्यात लस उपलब्ध नसल्याने पशुपालकांमध्ये घबाराट निर्माण झाली आहे हा गाय, बैल या प्राण्यावर लम्पी या आजाराची लागन दिसून येत आहे सोयगाव तालुक्यातील जामठी येथील शेतकरी तुकाराम कल्लू चव्हाण यांच्या बैलाला देखील लम्पी या आजाराची लागण झाली होती.
अखेर उपचार सुरू असताना मंगळवार दि.१३ रोजी बैलाचा मृत्यू झाला आहे या घटनेने गावासह ,तालुक्यात शेतकरीवर्ग व पशुपालकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सोयगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांनी याकडे गंभीरतेने लक्ष घालून लवकरात लवकर लम्पी आजार नियंत्रक लस उपलब्ध करून जनावरांचे लसीकरण करून घ्यावे अशी मागणी शेतकरी व पशुपालकांमधून होत आहे, जामठी येथील शेतकरी तुकाराम कल्लू चव्हाण यांनी लम्पी या आजराने आपला बैल दगावल्याची माहिती सोयगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिली आहे.