इलेक्ट्रिक स्कूटर वरून ती बॉयफ्रेंड सोबत फिरत होती, पतीने रंगेहात पकडली आणि …? पहा पुढे काय झाले.
अशी ही बनवाबनवी याचा प्रत्यय आग्रा या ठिकाणी आलाय कारण या महिलेने चक्क आपल्याच पतीला फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचीही फसवणूक काही क्षणातच उघडी झाली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा मध्ये पती-पत्नी आणि तो हाय प्रोफाईल ड्रामा भर रस्त्यावर सर्वांनी अनुभवला आहे. एक महिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत फिरत होती, इलेक्ट्रिक स्कूटर वरून ते दोघेजण एन्जॉय करत होते.
तेवढ्याच तिच्या पतीची नजर तिच्यावर पडली. पतीने तिचा पाठलाग सुरू केला पतीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने याचा व्हिडिओ बनवला. पती जोरा जोरात ओरडत होता. पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडने गाडी थांबवली पतीच्या ओरडामुळे तिथे गर्दी जमा झाली. दोघांमध्ये मारहाण झाल्याचे देखील सांगण्यात येते. या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या प्रकरणी पावती फाडली. तसेच दोघांनी पुन्हा असा प्रकार न करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी त्यांना दिला. या महिलेचे दहा वर्षपूर्वी लग्न झालं होतं तिला एक मुलगा, एक मुलगी आहे. तिचे प्रेम संबंध एका तांदळाच्या व्यापाराशी असल्याचे बोलले जाते. पतीला तिचे बाहेर कुठेतरी अफेअर सुरू असल्याचा संशय होता.
यामुळे त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आज त्यांना न सांगता ती घराच्या बाहेर पडली. तिच्यासारखा ड्रेस दिसतात पतीने पाठलाग सुरू केला. आणि पतीने आपल्या पत्नीला बॉयफ्रेंड सोबत रंगेहात पकडला. व्हिडिओमध्ये शिवीगाळ, मारहाण हे देखील आले मात्र या दोघांनाही पोलिसांनी समजूत घालून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला.