बायकोला न सांगताच पतीने तिची किडनी काढली, आणि त्या पैशाचे पहा त्याने काय केलं.
वेगळ्या आजाराचं कारण सांगत पतीने पत्नीसोबत अत्यंत धक्कादायक असं कृत्य केला आहे. दोघांमध्ये विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. मात्र या विश्वासाला तडा गेला आहे. जगभरात अनेक विचित्र अशा बातम्या तुम्ही पाहिले असतील, मात्र हा धक्कादायक प्रकार ओडिसा या ठिकाणी घडला आहे. अनेकदा आपण पाहतो कि लोक पैशासाठी कोणत्याही थराला जातात. तर अशा घटना तुम्ही ऐकून असाल.
मात्र ही घटना वाचून तुम्ही हैराण व्हाल. ओडीसा मधून एक बातमी समोर येते की, एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची किडनी तिला न विचारता विकली आहे. आणि त्यातून मिळालेला पैसाही गायब केला आहे. अशा पद्धतीने लोक कुटुंबातील व्यक्तींचा वापर पैशासाठी करतात हे ऐकूनच प्रत्येक जण अवाक होतात. मात्र ओडिसातील कोडा मेटा या गावातील एका पतीने आपल्या पत्नीसोबत असाच अजब प्रकार केला आहे.
पतीने तिला न सांगता तिची किडनी काळ्या बाजारात विकली आहे. तिला स्वतः चार वर्षानंतर याबाबत माहिती समजली आहे कि, पतीने तिला न विचारताच चार वर्षांपूर्वीच तिची किडनी विकली. किडनी स्टोनच ऑपरेशन झाल्याचं सांगत तिला रुग्णालयात किडनी स्टोनच्या ऑपरेशन संदर्भात रुग्णाला दाखल करण्यात आले होते आणि तेव्हाचा हा प्रकार आहे.
महिलेच्या पोटाचा खालचा भाग वेदना होत असल्याने ती डॉक्टरांकडे गेली तिथे सांगण्यात आले की, तिची एक किडनी आहे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे मात्र किडनी विकण्याचे कृत्य याच तुझ्या नवऱ्याने केले आहे. सध्या महिलेने पती आणि त्याच्या बहिणी विरोधात तक्रार दाखल केली असुन पोलीस या प्रकरणाची सखोल तपास करत आहे.