महत्वाची बातमी
Breaking News : फर्दापूर येथील धरणात बुडून 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे सायंकाळच्या सुमारास एका 19 वर्षीय तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
मोहित संतोष जाधव(वय 19)रा.फर्दापूर ता.सोयगाव जिल्हा औरंगाबाद असे धरणात बुडून झालेल्या तरुणाचे नाव आहे
फर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे हे घटनास्थळी दाखल होऊन सदरील तरुणाचे प्रेत शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे
दरम्यान या घटनेने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे