ब्रेकिंग -मुलीला भेटण्यासाठी आई -वडील निघाले;पण भेट झालीच नाही, वाटेतच मृत्यूने त्यांना कवटाळले !
मुलीला भेटण्यासाठी आई -वडील निघाले;पण भेट झालीच नाही
वाटेतच मृत्यूने त्यांना कवटाळले !
अहमदनगरच्या प्रत्येक महामार्गांवरती अपघाताच सत्र दिवसेंदिवस वाढत आहे, कल्याण रोड बायपास वरती एक मोठा अपघात झाला, पुणे जिल्ह्यातील हे दाम्पत्य आपल्या मुलीला भेटण्यासाठी येत होते मात्र काळाने घाला घातला .या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मुलीला भेटण्यासाठी आई-वडील निघाले होते, मात्र ही भेट झालीच नाही टँकर खाली आल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर इथले रहिवासी दत्तात्रय झळके हे वृत्तपत्र वितरक म्हणून काम करत होते, झळके हे त्यांच्या पत्नीसह दुचाकी वरून आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी अहमदनगर कडे निघाले होते. मात्र तत्पूर्वीच काळानं त्याच्यावर घातला .
अहमदनगर जवळ कल्याण फाटा येथे कांदा मार्केट जवळ टँकरची धडक बसून अपघातात झळके आणि त्यांची पत्नी यांचा जागीच मृत्यूमुखी पडले, झळके हे दाम्पत्य मनमिळाव स्वभावाचा होत , त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता. या अपघाताची वार्ता कळताच तळेगाव ढमढेरे या परिसरात शोक काळा पसरली, दत्तात्रय यांच्या मागे एक मुलगा, दोन विवाहित मुली, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. अचानक झालेल्या अपघातामध्ये या दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे झळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तीन मुलांचं मातृ-पितृछत्र कायमच हरवल.