एका मुलीसोबत अस घडलं! म्हणून लोकांनी दिल वाहन पेटवून , पाहा नेमक काय घडल त्या मुलीसोबत …
अपघाताचे नियम ढाब्यावरती बसून सुसाट वाहन चालवाल तर तुमच्यासोबत असंच घडेल, एका भरधाव वेगात आलेल्या वाहनाने दुचाकीस्वार मुलीला जोरदार धडक दिली. यात ती मुलगी गंभीर जखमी झाली, त्यामुळे संतप्त नागरिकांनी धडक देणाऱ्या वाहनाला पेटवून दिल,
यवतमाळ जिल्यातील पांढरकवडा मार्गावर अपघात झाला , भरधाव वेगातील प्रवाशी वाहनाने रस्ता क्रॉस करीत असलेल्या मुलीच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी तत्काळ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पांढरकवडा मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंप जवळ हा अपघात झाला. अपघात होताच संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या वाहनाला पेटवून दिले. यामुळे एकच खळबळ उडाली होती. एमएच27 बीझेड3495 असा दुचाकीला धडक देणार्या प्रवाशी वाहनाचा नंबर आहे.यावेळी घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. जखमी मुलीचे नाव अद्याप कळू शकले नाही.
बेशिस्त वाहन चालक आला धडा मिळावा म्हणून हे कृत्य त्या ठिकाणी करण्यात आल, त्यामुळे आपल्या वाहतुकीचे नियम पाळा आपल्यासह दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा.