ब्रेकिंग : शेअर मार्केट किंग, ” बिग बुल ” असे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला याचं निधन.
शेयर मार्केट मध्ये किंग समजले जाणारे असे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या बद्दल एक बातमी समोर आली आहे. ज्यांना बिग बुल या नावाने ओळखलं जायचं, त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. काही आठवड्यापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पण त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यावेळेस डॉक्टरांनी निधन झाल्याची माहिती दिली.
बिग बॉल यांना किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे, रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी दाखल केलं गेलं होतं. पण त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र आज पुन्हा सकाळी ६ वाजता प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलं पण या वेळेस डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
शेअर मार्केट मध्ये कोणत्या शेअर वर पैसे लावले पाहिजे ज्याने फायदा होईल, याचे भाकीत राकेश झुनझुनवाला हे करत असायचे. आणि त्यांनी दिलेला सल्ला हा योग्यच असायचा त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अनेक जण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. नवख्या गुंतवणूकदारांना यांचा खूप मोठा आधार वाटायचा. बिग बॉल यांच्या निधनामुळे शेअर मार्केटमध्ये शोककळा पसरली आहे. गुंतवणुकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्विटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदार पर्यंत सगळ्यांनीच राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.