दुरगाव तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची बसपा चे तालुकाध्यक्ष आलताफभाई शेख यांची मागणी.
कर्जत तालुक्यातील दुरगाव तलावात कुकडीचे पाणी पुर्ण दाबाने पाणी तलावात सोडण्याची मागणी कर्जत बसपा चे तालुकाध्यक्ष आलताफभाई शेख यांनी केली आहे. दुरगाव तलाव हा परिसरातील शेतीला वरदान देणारा तलाव आहे. गेली तीन चार वर्ष या तलावात कुकडीचे पाणी कमी सोडल्यामुळे येथील शेतीचे वाळवंट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
एक हजार हेक्टर क्षेत्र या तलावाच्या पाण्याने ओलिताखाली येत आहे. उन्हाळ्यात या पिण्यासाठी हा तलाव मोठा उद्भव स्त्रोत मानला जातो. या तलावाच्या पाण्यावर फळभागांचे मोठे क्षेत्र उभे आहेत. या भागात दुध व्यवसाय मोठा प्रमाणात आहे.त्यामुळे गवती चारा पण शेतात उभा आहे.संभाव्य पुढे पाणी कमी झाल्याचे शेतीचे नियोजन कोलमडले जाईल.
दुरगांव हे गांव बहुतांश बागायत असून दुरगांव,नांदगांव, कुळधरण परिसरात शेती आणि दुग्ध व्यवसाय फार मोठ्या स्वरुपात आहे. मात्र सदर ठिकाणी शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी पाण्याच आत्यंत आवश्यकता आहे. दुरगांव व दुरगांवचा सर्व परिसर येथील तलावातील पाण्यावर अवलंबुन आहे. मात्र सध्या सदरचा तलाव कोरडा पडलेला असून या परिसरातील शेती आणि दुग्ध व्यवसाय धोक्यात आलेले आहे.
तसेच परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे दुरगांव येथील तलावात पाणी सोडणे आत्यंत आवश्यक आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.सध्या कुकडीचे आर्वतन चालु आहे. आणि हे आर्वतन तात्काळ कुकडीचे पाणी तलावात सोडून येथील शेतकरी आणि दुग्य व्यवसाय धारक यांना मदत करावी परिसरातील नागरिक, शेतकरी यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ मदत व्हावी वरील मागणी प्रमाणे दुरगांव तलावात तात्काळ पाणी सोडून तलाव आणि तलावा खालील सर्व बंधारे न भरल्यास बहुजन समाज पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी.