नगर ब्रेकिंग; गणेश विसर्जन मिरवणूकीत शिंदे गट विरूद्ध ठाकरे समोर येताच पहा हे काय घडलं ? पोलिसांनी केली मध्यस्थी.
शहरात दहा दिवसाचा गणेशोत्सव थाटात संपन्न झाला. मात्र विसर्जनाच्या वेळी वाद उफाळला, हा वाद शिवसेनेतला आहे ज्या पद्धतीने आपण शिवसेनेत दोन गट पाहतो आणि त्यामुळे राज्यात ज्या पद्धतीने तणावाचं वातावरण झालेलं आहे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे नेमका शिवसेनेतील सर्व सामान्य कार्यकर्ता कोणत्या गटातला हा प्रश्न सध्या सर्वांना सतावत आहे. असाच पेज शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी निर्माण झाला. आणि त्यामुळे शिवसेनेतील दोन गटांमध्ये वाद झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा DJ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या गटाच्या पुढे घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंपरेनुसार शिवसेनेचा डीजे मिरवणुकीत चौदाव्या क्रमांकावरती असतो. मात्र त्या जागी शिवसेनेच्या शिंदे गटाचा DJ पुढे घेतल्याने ठाकरे गट आक्रमक झाला होता. ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्यानी मिरवणूक थांबवण्याचे इशारा देण्यात आले होते अखेर पोलीस प्रशासनाकडून चर्चा करून यावरती तोडगा काढण्यात आला.
जर नवीन मंडळाला मिरवणुकीत सहभागी व्हायचं असेल तर परंपरेनुसार ठरवून दिलेल्या क्रमांकाच्या मागे मिरवणुकीत सहभागी व्हावं. यावर ठाकरे गट ठाम होता अखेर ठाकरे गटाचा डीजे मिरवणुकीत पुढे आणण्यात आला आणि मिरवणूक सुरळीत झाली. शिंदे गटाकडून रितसर मिरवणुकीसाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याने पोलीस प्रशासना पुढे पेज निर्माण झाला.
त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून पुन्हा एकदा मिरवणूक सुरळीत केले. त्यामुळे मिरवणुकीत मोठा अनर्थ टळला थोडक्यात हा वाद सुरू होण्याआधीच संपुष्टात आला. त्यामुळे दहा दिवसाच्या गणरायाचे गणेशोत्सवाची सांगता ऊसाहत संपन्न झाली.