ताई मासे घ्या ! असे म्हणाला आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला आणि नंतर पहा त्याने काय केले.
माणुसकीच्या भावनेतून आपण अनेकदा एकमेकांना मदत करतो. वाटसरू रोज आपल्या दारासमोर आला तर त्याला देखील आपण सहकार्य करतो. फेरीवाले आले तर त्यांना देखील आपण पाणी किंवा बसा असं म्हणतो. मात्र कधी कधी आपलाच चांगुलपणा आपल्याला नडू शकतो. एका महिलेला याचा प्रत्यय आला पारोळा या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला.
ताई मासे घ्या ! नंतर म्हणाला पाणी पाजा असा बहाणा करून हा मासे विक्रेता घरात घुसला आणि महिलेचा विनयभंग केला अशी घटना एका गावात घडली. शंकर भोई असं विनयभंग करणाऱ्या मासे विक्रेत्याचे नाव आहे. विवाहित महिला तिच्या घरी अंगणात एकटी बसली होती. यावेळी घरात नेहमी मासे विकण्यासाठी येणारा व्यक्ती हा मासे विकण्यासाठी आला त्याने मासे हवेत अशी विचारणा केली.
त्यावर पीडित महिलेने पतीस फोन करून मासे घेण्याबद्दल विचारलं पतीने नकार दिल्यानंतर पीडित विवाहित महिलेने मासे विकत घेण्यास नकार दिला तर तो म्हणाला की, निदान मासे घेतले नाही तर पाणी तरी पाजा. असं म्हणून ती 29 वर्ष पिडीत विवाहित पाणी आणण्यासाठी घरात गेली. पाणी पिऊन झाल्यानंतर विवाहितेचा नंबर मागितला विवाहितेने नकार दिल्यानंतर जबरदस्तीने पकडून घराच्या बाथरूम मध्ये नेलं.
बिथरलेल्या विवाहितेने आरडाओरडा केला. त्यामुळे मासे विकणारा भोई त्या ठिकाणाहून पळून गेला. घरी आल्यानंतर पीडित विवाहितेने सर्व घटना आपल्या पतीला सांगितली. तसेच आपल्या भावाला मासे विक्रेत्याचे वर्णन करून सांगितलं. त्यानंतर त्याचं गाव माहित पडलं आणि त्यावरन पिडीत विवाहितेच्या फिर्यादवरनं मासे विक्रेता याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.