नगर वार्ता : कोपरगाव मध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू , पहा बातमी सविस्तर.

अत्यंत धक्कादायक अशी बातमी कोपरगाव समोर येते .कोपरगाव मध्ये एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला . याची सखोल चौकशी व्हावी ही मागणी केली जाते. या कोपरगाव तालुक्यातील खर्डी गणेश शिवारातील गडावरील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सैनिकी स्कूल चा इयत्ता बारावी मध्ये विद्यार्थी व येवला तालुक्यातील सत्य गावातील रहिवासी असणारा सौरभ सांगळे हा गारदा नदीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या मध्ये पडून संशयास्पद त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कोपरगाव सह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली.
या प्रकरणी मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन सरकारच्या धोरणा विषयी प्रत्येक जिल्ह्यात ३९ सैनिकी शाळा आहेत. त्या धोरणानुसार कोपरगाव तालुक्यातील सैनिकी शाळा सुरू करण्यात आली होती. याच शाळेतील हा विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात हजर केलं असता,या प्रकरणी संस्थेकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.कोपरगाव तालुका पोलिसांनी खबर देणारे परिवेक्षक गुलाब सर यांच्या खबरी वरून आकस्मात मृत्यूची नोंद केली. हे प्रकरण संशयास्पद असल्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत . पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल आंधळे हे या घटनेचा तपास करत आहेत. येवला रहिवासी असणारा सौरभ याचा असा मृत्यू झाला ,यामागे कारण काय असेल असा सवाल उपस्थित केला जातोय , त्याच्या नातेवाईकानी याबद्दलचा तपास जलद गतीने व्हावा अशी मागणी केली आहे.