नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांना स्मृती पुरस्कार देऊन केले सन्मानित.
( पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख ) – पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील विठ्ठल आसाराम गायकवाड हे स्वतः दिव्यांग असूनही गेली 22 वर्ष ते दिव्यांग लोकांना रक्त लघवी तपासण्या मोफत करून देतात तसेच शालेय विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी ही अल्प दरात करून देतात. हाच छंद त्यांना पूर्वीपासून असल्याने त्यांनी त्यांचे वडील कै.आसाराम गायकवाड यांचे निधनानंतर प्रत्येक वर्षी त्यांचे स्मृतिपित्यर्थ आगळावेगळा सामाजिक उपक्रम ते त्यांचे बंधू मुकुंद गायकवाड यांना घेऊन राबवतात.
यावर्षी सामाजिक कार्यकर्ते कै. आसाराम गायकवाड यांच्या तेराव्या स्मृतिदिनी त्यांनी तालुकास्तरीय पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीस मान्यवरांच्या हस्ते कै.आसाराम गायकवाड स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ नागरी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री.अर्जुनराव राजळे आबा हे होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कर्तोंना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले आहे.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मा.शिवशंकर राजळे, शिवसेना तालुका अध्यक्ष नवनाथ वाघ,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष योगिताताई राजळे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मा.अंकुशराव चितळे, अँड. वैभव आंधळे,व्हा. चेअरमन आदिनाथ पतसंस्था, बाबासाहेब बर्डे,अच्युतराव वाघ,संचालक वृ स सा का., चारूदत्त वाघ ,संदीप नेहुल,भाऊसाहेब तांदळे, नामदेव मुखेकर, हनुमान टाकळी गावच्या सरपंच मीनाताई शिरसाठ, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री कुशिनाथ बर्डे, बाळासाहेब बर्डे, निलेश काजळे, भाऊसाहेब बलफे ,बंडू बर्डे चेअरमन, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.कुशल भापसे, दुर्गा शंकर पतसंस्थेचे चेअरमन पडोळे साहेब, मारुती दगडखैर,अनिस .तालुका अध्यक्ष शशिकांत गायकवाड म्हातारदेव गायकवाड ,धोंडीराम बर्डे, कवी आत्माराम शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कै. आसाराम गायकवाड स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये आदर्श कुशल कारागीर मा .यशवंत जयवंत मरकड (कासार पिंपळगाव), आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर बाळकृष्ण मरकड, (तिसगाव), चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती सुभाषराव बर्डे (ह.टाकळी),आदर्श प्रगतशील शेतकरी मंगेश भगत, (का.पिंपळगाव), सामाजिक कार्य पुरस्कार डॉक्टर रामदास बर्डे (पाथर्डी),आदर्श पत्रकार पुरस्कार _ अशोक मोरे (करंजी), आदर्श उद्योजक पुरस्कार अण्णासाहेब दगडखैर(ह टाकळी),आदर्श कवी पुरस्कार बाळासाहेब कोठुळे (चितळी) ,आदर्श महिला पुरस्कार संगीताताई भापसे (निंबोडी), आध्यात्मिक सेवा पुरस्कार कु. वैष्णवी मुखेकर (करंजी), आदर्श श्रावण बाळ पुरस्कार – भरत दगडखैर (हनुमान टाकळी), आदर्श शिक्षक पुरस्कार विजय कारखेले (त्रिभुवनवाडी) ,आदर्श उद्योजक पुरस्कार भाऊसाहेब शेलार (कौडगाव ),आदर्श सामाजिक कार्य पुरस्कार विजय राठोड ( करडवाडी ), दिव्यांग सेवा पुरस्कार – अशोक खेडकर ( पाथर्डी ), युवा सरपंच पुरस्कार – गणेश पालवे (घाटशिरस ) आदर्श गणेश मंडळ पुरस्कार महारुद्र प्रतिष्ठान (हनुमान टाकळी) यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब कोठुळे, विजय कारखेले, शिवशंकर राजळे, अर्जुनराव राजळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी हरिभक्त परायण काशिनाथ महाराज राजळे व ह भ प बबन महाराज भिसे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले. आभार सुभाषराव बर्डे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी संतोष कर्डिले, तुषार बर्डे, लक्ष्मण बर्डे, उमेश बर्डे, सारंगधर बर्डे, बाबासाहेब घुले, संदीप गायकवाड, साईनाथ भगत, मनोज बर्डे, सोमनाथ दगडखैर, श्याम सर दगडखैर, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, शिवाजी गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, अविष्कार गायकवाड, काकासाहेब गायकवाड, योगेश भा. गायकवाड, शिरीष गायकवाड, योगेश वि गायकवाड,संतोष बावणे, दिलीप बलफे, प्रशांत गायकवाड, आकाश बर्डे, आसाराम बांदल, मुकुंद , गायकवाड कुटुंबियांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी हनुमान टाकळी व पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते