जरंडीत ठेकेदारांनी लावली कृषीमंत्र्यांच्या निधीच्या रस्त्याची वाट.

एकाच रस्त्याच्या कामावर दोन ठेकेदार,रस्ताही अपूर्णच: जरंडीतील प्रकार.
सोयगाव, दि..२४..जरंडी गावात २५/१५ अंतर्गत मंजूर झालेल्या आमदार निधीच्या रस्त्याचे काम चक्क दोन दोन ठेकेदार कामासाठी असून ३०० मीटरच्या या रस्त्याच्या कामासाठी थेट दोन दोन ठेकेदार असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.
मात्र तरीही सदरील रस्ता हा अद्यापही अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने पंधरा दिवसांपासून भर वस्तीत खडी अंथरूण ठेवल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
जरंडी येथे १५ लक्ष रु चा ३६८ मीटर रस्त्या साठी आमदार फंडातून काम मंजूर आहे या रस्त्याच्या कामासाठी यंत्रणा वेगळी तर ठेका वेगळा व काम तिसराच ठेकेदार करतोय अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
तरीही रस्ता अपूर्णच असून प्रत्यक्षात रस्ताही ३६८ ,मीटर चा होणार नसून या रस्त्याचे गावात तीन ठिकाणी विभाजन करण्याचा घाट संबंधित ठेकेदारांनी रचला आहे…
——ठेकेदारांनी लावली कृषीमंत्र्यांच्या निधीच्या रस्त्याची वाट.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निधीतून हा २५/१५ अंतर्गत रस्ता करण्यात येत आहे पण या रस्त्यावर दोन दोन ठेकेदार व रस्ता अपूर्ण त्यामुळे या ठेकेदारांच्या मनमानी मुळे रस्त्याची वाट लागली आहे…