सोयगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतीपैकी तीन सरपंच पदे महिला राखीव; सोमवार पासून अर्ज स्वीकृती…
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.२५..सोयगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायती साठी सोमवारी (दि .२८) नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची मुदत असून तीन टेबलवर सहा कर्मचारी नामनिर्देशन पत्र स्वीकारतील अशी माहिती निवडणूक अधिकारी हेमंत तायडे यांनी दिली.
सोयगाव तालुक्यात वरखेडी(खु)-ठाणा,सावरखेडा-लेनापुर, वनगाव-घोरकुंड, कंकराळा-रावेरी आणि वाडी-सुतांडा- नायगाव या पाच ग्रामपंचायत साठी सोमवारी दि.२८ ते दोन डिसेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची मुदत आहे.
दरम्यान या पाचही ग्रामपंचायत साठी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असून पाच पैकी वरखेडी-ठाणा,सर्वसाधारण महिला, सावरखेडा-सर्वसाधारण महिला, आणि वाडी-नायगाव-सर्वसाधारण महिला सरपंच पद राखीव झाले असून या पाच ग्रामपंचायत साठी चुरस वाढणार आहे.
कंकराळा-रावेरी ही ग्रामपंचायत चे सरपंच पद अनुसुचित जमाती कडे राखीव झाले असून वनगाव-घोरकुंड ही ग्रामपंचायत नागरिकांचा मागासप्रवर्ग यासाठी राखीव आहे त्यामुळे कंकराळा वगळता सर्वच ठिकाणी चुरस पहावयास मिळणार आहे.
पाच ग्रामपंचायत साठी सहा हजार ७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे तर सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने सरपंच पदासाठी वेगळे मतदान करावे लागणार आहे.
—–राजकीय पक्षांनी सदस्यांच्या ऐवजी सरपंच पदाच्या उमेदवारा साठी कस लावला आहे त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील गाव कारभारी म्हणून तीन ग्रामपंचायती साठी महिलराज येणार आहे.