कंकराळा येथे कृषीमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांची पिक नुकसान पाहणी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील मौजे कंकराळा येथे दि.२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद जिल्हा नुकसान पाहणी दौरा दरम्यान कृषी मंत्री यांनी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर यामहिन्यात सतत पावसामुळे शेत पिकांचे ३३% टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुस्थिती पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत स्वतः कृषी मंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांन सोबत संवाद केला व नुकसान झालेल्या बांधित पिकांची पाहणी केली , त्यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत आहे एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले
त्यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी संपत वाघ, पोलिस निरीक्षक अनमोल केदार, नायब तहसीलदार वी.टी.जाधव , कृषी विस्तार अधिकारी दिनकर जाधव , ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , कृषी सहायक प्रक्षीत पाटील , तलाठी पवार आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
तसेच गावातील प्रतिष्ठित मा.सरपंच शिवदास राजपुत, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख आबासाहेब काळे, माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष केशवराव तायडे,जिल्हा परिषद सदस्य गोपिचंद जाधव, युवा नेते कुणाल राजपुत , नितीन बोरसे , श्रीराम चौधरी, समाधान पाटील, संतोष शिंदे , किरण पाटील, मोतीलाल घुसिंगे, सुनिल पाटील, राहुल बोराडे,आकाश मख,शाम पाटील, गणेश आगे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.