बाप रे ! मुलांना शाळेत सोडायला जात असताना वाटेतच वडिलांसोबत घडले धक्कादायक.

पंढरपूर प्रतिनिधी:ज्योतीराम कांबळे
यातील हकीकत अशी की अमिन दगडू शेख राहणार अंबिका नगर बाळे सोलापूर हे त्यांच्या मुलांना पंढरपूर मदरसा उर्दू शाळेत मध्ये सोडायला जात असताना नवीन पुलावरती समोरील वाहनातुन गाडी क्रमांक 13.DQ…0491 या वाहनांमध्ये लोखंडी पत्रे व लाकडी वासे घेऊन जात असताना त्यातील एक पत्रा उडून अमीन शेख यांच्या मानेवरती जोरदार बसला.
त्यातच त्यांच्या मानेला खूप मोठी जखम झाली होती, काही समाज बांधवांनी त्यांना कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं कालच अमीन शेख यांच्या मोठ्या मुलाचा वाढदिवस त्यांनी घरी साजरा केला होता.
अमीन शेख यांना दोन मुले व एक मुलगी पत्नी असा परिवार आहे अमीन शेख मुलांना मदरसा उर्दू शाळेमध्ये दाखल करण्यासाठी पंढरपूरकडे निघाले होते वाटतच त्यांच्यावरती नियतिने निघाला घातला व त्यातच ते मृत्यू पावले ही बातमी समजतात अंबिका नगर बाळे सोलापूर येथील अमीन शेख चे कुटुंब सर्व नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.