बाप रे ! चक्क १ वर्षाच्या मुलाने केला आहे हा कारनामा; व्हिडिओ होतोय व्हायरल.

लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहिले असतील पण सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक वर्षाच्या चिमुकल्याने २४ सेकंदपर्यंत त्या रॉडला हात घट्ट धरून ठेवले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्या लहान मुलाची आई २४ सेकंदपर्यंत काउंट करते आणि तोपर्यंत तो मुलगा डेड हँगिंग एक्सरसाइज करत असतो. विशेष म्हणजे या व्हिडीओत मुलाच्या चेहऱ्यावर स्माइल दिसत असते.
baby_lovers_ind या अकाउंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे तर काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.