अरे बाप रे ! बाळाला उकळत्या दुधाने घातली अंघोळ; चिमुकला तडफडत होता पण…
विज्ञान कितीही पुढे गेले तरी आजही जगात अस्गीही लोक आहेत कि जे विज्ञानाला किंमत न देता वैद्यकीय उपचारापेक्षा भूतबाधाला अधिक महत्त्व देतात. काळी जादू, गुप्तधन यासारख्या प्रकारातून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. असाच काहीसा प्रकार वाराणसीतून समोर आला आहे.
एका ठिकाणी पूजा करताना पूजेत एका चिमुकल्याला उकळत्या दुधाने अंघोळी घातली आहे. हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलाच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार निच आहे.ही घटना उत्तरप्रदेश मधून नुकतीच समोर आली आहे.
येथे श्रद्धेच्या नावाखाली आयोजित गोवर्धन पूजेत एका चिमुकल्याला उकळत्या दुधाने अंधोळ घातल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल कि, एक व्यक्ती एका बाळाच्या उघड्या अंगावर मातीच्या भांड्यातील उकळत्या दुधाचा फेस काढून लावत आहे. यावेळी बाळ वेदनेनं व्हिवळत होतं, मात्र तरीही उपस्थित असलेल्यापैंकी कुणालाही बाळाची दया आली नाही. सगळे हा प्रकार फक्त बघत होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर संताप व्यक्त करत आहेत. तर अनेकांनी या पंडितावर कारवाई करण्याची आणि इथून पुढे हे प्रकार थांबवण्याची मागणी केली आहे.