डियर, प्लिज मला लिफ्ट देता का ? सुनसान रस्त्यावर मागितली लिफ्ट अन पुढे घडले असे काही..
आपण समाजात वावरत असताना अनेकांना सद भावनेने मदत करतो. रात्री अपरात्री असे अनेक प्रकार घडत असतात. अनेकदा आपण रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला जर कोणी उभं असेल आपल्याला मदत मागत असेल तर अनेक जण मदतही करतात. मात्र एखाद्याची मदत करणे किंवा एखाद्याची मदत घेणं हे आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. याचा प्रत्यय येणारी ही घटना आहे.
मध्य प्रदेश मधील इंदोरी या ठिकाणी एका महिलेने लिफ्ट मागितली. महिलेला कोणाकडून लिफ्ट घ्यायची असेल त्याला ती डीअर असं म्हणून थांबवते. तिच्या बोलण्यावरून ड्रायव्हर तिला हाय प्रोफाईल महिला समजतो आणि तिच्या बोलण्यात येऊन सहज लिफ्ट देतो. मग ती गाडी निर्जन भागात पोहोचताच ती महिला या व्यक्तीला थांबवून त्याला खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी देते आणि लूट करते.
एखाद्याने विरोध केला तर चाकू दाखवून महिला त्याला लुटते, अशाच पद्धतीने सुनसान रस्त्यावरती उभा असणाऱ्या महिलेला लिफ्ट दिली आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत महिलेने लुटमार केल्याचे लक्षात आले. गांधीनगर भागातील सुपर कॉर्डियर वरती एक महिला उभी होती तिथून एखादी व्यक्ती जाताना पाहून ती त्याला थांबवत होती. सुनसान भागात उभी असलेली महिला लोकांना पाहून लोक तिला लिफ्ट हे देत होते, मात्र हीच महिला त्यानंतर त्यांची लूटमार करत होती.
असाच एक लुटमारीचा व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. याप्रकरणी संपूर्ण व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाला अधिकाऱ्यांचे म्हणणं होतं की, व्हिडिओच्या आधारे वेगवेगळ्या भागात रात्रीची गस्त घालत आरोपींचा शोध घेतील. एसपी रूबाना मिर्झा यांनी सांगितलं की, तक्रारदाराने तक्रार केली आहे. आम्ही त्या घटनेचा अधिक तपास करत आहोत तसेच आरोपीला लवकरच पकडला जाईल.