प्रेमविवाह होऊनही ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली, पतीने रंगेहात पकडले आणि….
” कबाब मे हड्डी ” अशी म्हण तुम्ही ऐकली असेल, मात्र प्रत्यक्षात असं झाल्यानंतर संसार उध्वस्त होऊ शकतो अशीच एक बातमी समोर येते पती-पत्नीच्या संसारामध्ये एक व्यक्ती आला आणि या दोघांचा संसार अवघ्या दोन वर्षांवर मध्येच संपला पतीला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागत होतं आणि त्यामुळे पत्नी घरी एकटी असायची दरम्यान पत्नीला एका कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि याच दरम्यान पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली या दोघांच्या गाठीभेटी वाढल्या आणि त्यातून एक चुकीची घटना घडली लपून छपून होणाऱ्या या गाठीभेटी एकदा उजेडात आल्या या महिलेच्या पतीनेच आपल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडला.
लग्न प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. कारण त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार असतं. यात बऱ्याचदा अशी प्रकरणं देखील समोर आली आहेत. ज्यांचं जबरदस्तीने लग्न लावलं जातं. अशा प्रकरणात काही लोक आपला संसार आहे तो संसार पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक हे यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करु लागतात. पण यासगळ्यामुळे बऱ्याचदा नवरा आणि बायको दोघांपैकी कोणीही सुखी राहात नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. खरंतर एका नवऱ्याने आपपल्या बायकोला दुसऱ्याच व्यक्तीसोबत पाहिले. त्यानंतर त्याने जे केलं, त्याच्या कृत्याने सगळ्यांच लक्ष या प्रकरणाकडे वळलं आहे.
हे प्रकरण बिहारमधील आहे. येथे मखदुमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुमडी गावातील रामराज नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी रुपाकुमारीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही शहरातील नया टोला परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. नवरा मिठाई बनवणारा आहे आणि त्याच्या कामामुळे त्याला बऱ्याचदा बाहेर जावं लागतं, जेथे तो लग्नसमारंभात वैगरे मिठाई बनवतो. दरम्यान, पत्नी रूपाला एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. नोकरी करत असताना रुपा ही विक्रम रणजीत कुमार नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्या दोघांची गुपचुप भेट सुरु राहिली. नवरा घरी नसताना रुपा ही रणजीतला घरी बोलवू लागली. रविवारी नवरा कुठेतरी बाहेरगावी गेला होता. तेव्हा रुपाने पुन्हा आपल्या प्रियकराला बोलवून घेतले.
पण जेव्हा तिचा नवरा घरी पुन्हा आला, तेव्हा मात्र तिचं प्रकरण उघडं पडलं. त्यानंतर पतीने खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकरणामध्ये महिलेच्या पतीचे पाऊल खूपच धक्कादायक होते. त्याच्या अशा वागण्याने, पत्नीच्या बेकायदेशीर प्रेमकथेला कायदेशीर व्यवहारात उतरवण्यास त्याने आपल्या वतीने ग्रीन सिग्नल दिला आहे. पतीच्या सांगण्यावरून पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत. पत्नीनेही पोलिसांसमोर कबूल केले आहे की, तिचे गेल्या सहा महिन्यांपासून तिचं रणजितवर प्रेम होतं आणि तिचंही त्याच्यासोबत संबंध आहेत. तिला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे. त्यानंतर नवऱ्यानं या प्रकरणातून काढता पाय घेतला आणि आपल्या दोन वर्षाच्या संसाराचा दि एन्ड केला.