नगर ब्रेकिंग : आमचा समाज गरीब असल्याचे म्हणत तरुणाने केले धक्कादायक कृत्य, व्हिडियो होत आहे व्हायरल !

नगर तालुक्यातील आरणगाव येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय या व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपल्या आत्महत्या पूर्वी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावे घेतली जात आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याबद्दल अनेक चर्चा होत आहेत मात्र आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावे घेणारा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नितीन शिंदे असल्याच समोर येत आहे.
नगर तालुक्यातील आरणगाव या ठिकाणी बायपास चौकामध्ये झेंडा लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचे पडसाद या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे या घटनेचे पडसात म्हणून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला यामध्ये आत्महत्येचा प्रवृत्त असणाऱ्या व्यक्तींची नावे घेतली आहेत.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा या घटनेसोबत काही धागादोरा आहे का याबद्दल चर्चा केली जाते मात्र जेव्हा झेंडा लावल्यावर दोन गटांमध्ये हाणामारी झाली तेव्हा आरणगाव या ठिकाणी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता यावेळी सुमारे २०० – २५० लोकांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला होता यातील आठ जणांना अटक देखील करण्यात आली होती.
या घटनेशी या तरुणाचा काही संबंध आहे का ? या तरुणाने कुठल्या दबावांमध्ये येऊन आत्महत्या केली का ? हे तपासाअंती निष्पन्न होईल. आत्महत्या करण्यापूर्वीच्या या व्हिडियो ने तालुक्यात खळबळ माजली आहे. गळ्यात फास अडकवून या व्हिडियो मध्ये तो तरुण म्हणत आहे कि, ” आमचा समाज गरीब असल्या कारणाने आमच्या समाजातील गरीब पोरांचे नावे यांनी दिले आहेत. आमच्या समाजावर अन्याय केला आहे. यांच्या टेंशनमुळे मी आत्महत्या करत आहे. दंगली प्रकरणामध्ये माझे नाव घेतले होते आणि म्हणून रागावैतागे मी आत्महत्या करत आहे. मला न्याय पाहिजे आहेत तसेच माझ्या कुटुंबाला देखील न्याय द्या.