आधी या शाळेला कोणी ढुंकून पाहत नव्हते, आता लागते प्रवेशासाठी लांबच लांब रांग; पहा काय आहे कारण.

सरकारी शाळा म्हटलं की शिक्षण योग्य नाही, सरकारी शाळेतील शिक्षकांना शिक्षणाबरोबरच आणखीही जास्तच काम जिल्हा परिषद करायला लावते. अशा अनेक तक्रारी या सरकारी शाळेबद्दल असतात आणि त्यामुळे अनेक वाड्यावर या सरकारी शाळा बंद देखील झाल्या आहेत. मात्र अशी एक शाळा आहे ज्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक वर्ग अक्षरशा लांब ची लांब रांग लागते. यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या शाळेने कायापालट केला आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे ते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारी यांनी.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे यांचे जालिंदर नगर पुणे येथे सरकारी शाळेत बदली झाली, तेव्हा तिथे केवळ तेरा विद्यार्थी होते. काही महिन्यानंतर ही संख्या 80 च्या पुढे गेली. पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी मध्ये त्यांनी जे बदल घडवून आणले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.
दत्तात्रय वारे यांना 2016 मध्ये उत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मात्र त्यांच्या आयुष्यातला संघर्ष काही कमी होत नव्हता. पाच वर्षानंतर त्यांना आर्थिक हेराफेरी आणि पदाचा गैरवापर केल्याचा अशा आरोपांचा सामना ही करावा लागला. त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं मात्र फेब्रुवारीमध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आलं. आणि त्यानंतर खेड तालुक्यातील जालिंदर नगर या ठिकाणी त्यांची बदली झाली.
तिथे बदली होताच तिथल्या प्राथमिक शाळेची अवस्था वाईट होती शाळेत फक्त तेराच विद्यार्थी होते आणि एक शिक्षक शाळेत जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता. ते म्हणतात की मला ज्या प्रकारे निलंबित करण्यात आलं त्यामुळे मला धक्का बसला. आणि निराश्य आले पण जेव्हा मी शाळेत रुजू झालो तेव्हा मी सदरील शाळेची अवस्था बदलण्याचा निर्णय घेतला. वाऱ्यांना मुख्याध्यापक संदीप मसगुडे यांना त्यांच्या योजना बद्दल सल्ला दिला असं वारे म्हणाले.
आम्ही पुन्हा स्थानिक लोकांशी बोललो, शाळेच्या सुधारना करण्यात त्यांचा सहभाग मागितला. बागलवाडी शाळेतील आमच्या कामाची त्यांना माहिती दिली. त्यामुळे त्यांनी उत्साह दाखवला त्यानंतर आम्ही शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करणाऱ्या सुरुवात केली. गळती असलेल्या छतांच्या जागी आकर्षक पॉलिथिन सिटी लावण्यात आले. फरशीवर मार्बल स्टाईल बसवण्यात आली शासकीय निधीमधून कंपाउंड भिंतीच कामही करून घेतलं.
त्यांनी 100 दिवसात शाळेची सुधारणा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा देखील सदुपयोग केला आणि त्यामुळेच ही शाळा अत्यंत वेगळी पाहायला मिळाली. आता या शाळेतून सुसज्ज प्रयोगशाळा, एक लॅपटॉप इतर साहित्यांसह वर्चुअल रियालिटी गॉगल देखील आहेत. 2012 मध्ये पुणे येथील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील या शाळेचा कारभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट झाला.