बैलगाडीने येणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर कोसळली वीज; एक खाली कोसळला तर दुसऱ्या सोबत बैलाने पाहा काय केले.

सध्या राज्यामध्ये सगळीकडेच पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाली यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे विजेच्या कडकडाटेसह या झालेल्या मुसळधार पावसाने विदर्भात वीज पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील दोघांचा तर चंद्रपूर जिल्ह्यातील तीन आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. बैलगाडी मध्ये घरी परतणाऱ्या दोन शेतकऱ्यांवर वीज पडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
विदर्भामध्ये पावसानं थैमान मांडले आहे. रविवारी दिवसभर विदर्भात विजांच्या कडकडाटेसह मुसळधार पाऊस पडला आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मांगवी गावातील सोमेश्वर पोटकर व गुंडेराव हे रिंगीने शेतातून घरी बैलगाडीवर परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली आणि यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला.
यातील एक जनाचा मृतदेह चालत्या गाडीमधून खाली कोसळला, तर दुसऱ्याचा मृतदेह रिंगीवर अडकून राहिला. वीज कोसळल्याची बैलांना अजिबातही कल्पना नव्हती त्यामुळे बैलगाडी मालकाचा मृतदेह घेऊन थेट घरीच पोहोचला. जेव्हा विज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांना कळली तेव्हा या दोघांच्या मृत्यूमुळे गावांमध्ये हळूहळू व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाचे दिवसमान असून अश्या काही गोष्टी घडत असतात, त्यामुळे आपण या पावसामध्ये योग्य ती खबरदारी घ्यायची असते. आज या दोघांच्या जाण्याने त्या दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.