माझं गाव

लिव्हरच्या आजारानी ग्रासलेल्या एकुलत्या एक मुलाचा जीव वाचविण्यासाठी आई-वडिलांची भावनिक साद.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलाच्या पुढील उपचारासाठी ठरत आहेत अपयशी

विजय चौधरी-औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

कन्नड दि.30…..तालुक्यातील अंधानेर येथील अनंता सुखदेव पंडित यांचा एकुलता एक मुलगा ओम पंडित वय वर्ष 15 याला अचानक लिव्हरच्या आजाराची समस्या उद्भवल्याने त्याच्यावर मुंबई येथील नानावती हॉस्पिटल किंवा पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे त्याच्या लिव्हर संबंधी वैयक्तिक टेस्टिंगसाठी मोठ्या रकमेची गरज आहे मात्र आई-वडिलांची हालाखीची परिस्थिती आणि आई-वडील हात मजुरी करून चालवीत असलेला कसातरी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह यामुळे आपला एकुलता एक पंधरा वर्षीय मुलगा ओम याच्या उपचारासाठी असमर्थ ठरत आहेत

गेल्या काही दिवसापासून ओम हा लिव्हरच्या आजाराने त्रस्त असून उपचाराअभावी तो घरीच अंथरुणाला पडून आहे त्याच्या पुढील उपचारासाठी अगोदरच हलाखीची परिस्थिती असल्याने आई-वडील असमर्थ ठरत आहेत त्यांनी न्यूज च्या माध्यमातून आमचा मुलगा ओम च्या पुढील उपचारासाठी आम्हाला आपल्या परीने मदत करावी अशी याचना न्यूज च्या माध्यमातून केली आहे

आम्हाला 9890998061 किंवा 9623373434 या फोन पे नंबर वर आपल्या परीने आम्हाला मदत करावी अशी याचना व विनंती केली आहे

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!