नाराज गर्लफ्रेंडमुळे झाला पर्दाफाश; रक्ताचा काळाबाजार करणारा तरुण गजाआड पहा बातमी सविस्तर.
”जब गर्लफ्रेंड नाराज होती है, तो कायनात आती है,
लिव्ह इन रिलेशनशिपने केला ‘ब्लड रॅकेट’चा खुलासा,
अनेकदा सरकार आणि सेवाभावी संस्थांकडून ‘रक्तदान’ करण्याचं आवाहनही केलं जातं. जेणेकरून देशातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही आणि माफक किमतीत रक्त उपलब्ध होईल. मात्र, काही लोक या रक्ताचाही काळा बाजार करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये उघड झाली आहे.रक्ताचा काळा बाजार करणाऱ्या 12 आरोपींच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 128 युनिट रक्त, ब्लड बँकेच्या 350 पावत्या आणि एक टाटा झेस्ट कार जप्त करण्यात आली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये 12 जणांचा समावेश आहे.
शान मोहम्मद, मोहम्मद इमरान, हनीफ उर्फ फिरोज, संदीप कुमार उर्फ दीप, दिनकर त्रिपाठी, प्रभाकर पटेल, रजनीश कुमार, आशीष यादव, विमलेश यादव, सचिन यादव, विशाल पाठक आणि अनिल कुमार मिश्रा अशी या आरोपींची नावं आहेत.अटक केलेल्या आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 419, 420, 467, 468, 471, 275 आणि अंमली पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 18A (1), 18C अंतर्गत जॉर्ज टाउन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शान मोहम्मदच्या ‘लिव्ह इन पार्टनर’नं दाखल केलेल्या तक्रारीमुळे रक्ताचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. तक्रारदार महिला शान मोहम्मदसोबत गेल्या चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोन वर्षांपूर्वी या महिलेला मुलगाही झाला. पण, शान मोहम्मद तिच्याशी लग्न करत नव्हता. जेव्हा ही महिला शानवर लग्नासाठी दबाव टाकत असे तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरं देऊन तिला धमकावत असे. या प्रकाराला कंटाळून नाराज महिलेनं प्रयागराजमधील जॉर्ज टाउन पोलीस स्टेशनमध्ये शानविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत असताना ‘ब्लड रॅकेट’चा खुलासा झाला