काका – काकूंचा कॉमेडीचा व्हिडिओ पहिला का ; VIDEO पाहून हसू आवरणार नाही.
एक नंबर जोडी , काकाच काकू वर एवढ प्रेम पुन्हा वर माला घालू लागले अन काकू हसू लागल्या, हे निखळ प्रेम सर्वत्र पाह्यला मिळत नाही, एक सामान्य आणि मध्यमवर्गीय दाम्पत्य बाईक घ्यायला शोरूममध्ये गेलं. त्यानंतर त्यांच्यात जे घडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता अगदी साधी साडी नेसलेली अगदी भोळीभाबडी महिला आणि तिचा भोळाभाबडा नवरा, दोघंही गाडीच्या शोरूममध्ये आहेत. त्यांनी नवीकोरी बाईक घेतली आहे. कुणीतरी त्यांचा व्हिडीओ शूट करतं आहे. आता गाडी म्हणजे कुटुंब, घरातील एक नवा सदस्य. त्यामुळे तिची पूजा केली जाते, तिला हार घातला जातो. या गाडीचा मालकही शोरूममध्ये हातात फुलांचा हार घेऊन येताना दिसतो. त्यावेळी त्याची बायको या बाईकशेजारी उभी असते. बाईकसोबत फोटो काढत असते.
आता हार घेऊन आलेल्या व्यक्तीने गाडीला हार घालणं अपेक्षित होतं. पण तो बाईकशेजारी उभ्या असलेल्या आपल्या बायकोला हार घालायला जातो. हे दृश्य पाहून जसं आपल्याला हसू येतं, तसं त्या व्यक्तीच्या बायकोसह तिथं उपस्थित प्रत्येकजण हसू लागतो. त्यानंतर तो बायकोच्या गळ्यातील हार काढून त्या बाईकला घालतो.
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. व्हिडीओतील संभाषण मराठीत आहे. यावरून हे कपल महाराष्ट्रीयन असावं. पण हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर कुणी यामागील भावना समजून सांगितली आहे. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो.