रेल्वे स्टेशनवर कडाक्याचं भांडण; तरुणीला धावत्या ट्रेनसमोर ढकललं, एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट.
प्रेमात युद्धात सर्व काही माफ असत अस म्हंटल जात , मात्र याच प्रेमात युद्ध झाल तर धक्कादायक घटना घडतात ,प्रेमात होकार नकार असे अनेकप्रकार असतात यातून चुकीचे पाउल उचले जातात . अशी एकबातमी समोर येत आहे , एका तरुणानं महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चालत्या ट्रेनसमोर ढकललं.यात त्या मुलीचा मृत्यू झाला , या दोघात वाद झाला होता अशी माहिती समोर येत आहे .पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
चेन्नई रेल्वे स्थानकात एका तरुणानं महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चालत्या ट्रेनसमोर ढकललं. त्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तरुण आणि तरुणीमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांना आहे.चेन्नई रेल्वे स्थानकात एका तरुणानं महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चालत्या ट्रेनसमोर ढकललं. त्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तरुण आणि तरुणीमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकलं नाही.
एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. चेन्नईतील सेंट थॉमस माऊंट रेल्वे स्टेशनवर दुपारी दीड वाजता ही घटना घडली. सत्यप्रिया असं मृत तरुणीचं नाव आहे. तिचं वय २० वर्षे होतं. ती अडंबक्कम येथे वास्तव्यास होती. महाविद्यालयात शिकत असलेल्या सत्यप्रियाची आई पोलीस दलात शिपाई म्हणूव कार्यरत आहे.
आरोपी सतीश हादेखील अडंबक्कमचा रहिवासी आहे. सतीश आणि सत्यप्रिया फलाटावर उभे होते. त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. सतीशनं सत्यप्रियाला चालत्या ट्रेनसमोर ढकललं. ही ट्रेन तांबरमहून एग्मोरला जात होती. ट्रेनच्या धडकेत सत्यप्रियाचा मृत्यू झाला. सत्यप्रियाला धक्का देऊन सतीश तिथून फरार झाला. दोघांमधील वादाची कल्पना त्यांच्या कुटुंबाला देखील होती,वेळीच याकडे लक्ष दिल गेल असत तर असा अनर्थ झाला नसता एका मुलीला जीवं गमवावा लागला नसता.