आधी मोबाईलवर चॅटिंग, नंतर केली न्यूड कॉलिंग ! पुण्यातील तरुणासोबत हनीट्रप पहा त्याने पुढे काय केल….
हनीट्रप अनेक प्रकार होत असतात , असा एक प्रकार पुण्यात घडला . यातून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअॅपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
त्या तरुणाला हा त्रास रोजचाच होऊ लागला त्यात त्याचा मानसिक त्रासही वाढला. शेवटी मानसिक त्रासाला कंटाळून संबधित तरुणाने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या त्रासाला कंटाळून पुण्यात एका तरुणाने स्वतःच आयुष्य संपवून घेतले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमोल राजू गायकवाड (रा. तानाजी नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
एका अनोळखी मोबाईलवरून आलेल्या मेसेज वरून चॅटिंग सुरू झाले. त्याचे प्रमाण वाढत जाऊन न्यूड कॉलिंग पर्यंत गेले. त्यानंतर संबंधित तरुणाला त्या अनोळखी नंबर वरील व्यक्तीने ब्लॅकमेल करायला सुरू केली.