” आधी ओळख केली, नंतर घरात घुसला आणि त्या घरातील अल्पवयीन मुलीवरच..” पहा सविस्तर बातमी.

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी तसेच अत्याचाराच्या घटना घडत आहेत. इतर शहराप्रमाणे अहमदनगर मध्ये देखील अत्याचाराचा घटना घडल्यात आज देखील आपण याच विषयावर बोलणार आहे नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला चीड आणणारी घटना उघडली आहे ही बातमी ऐकून तुमचा राग हा अनावर होईल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर शहरात एका अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन जवळजवळ एक वर्षभरापासून अत्याचार केला जात होता.
त्यामध्ये मिळालेली माहिती अशी की, मुलीच्या घरासमोरच पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे हा रस्त्याने येता-जाता थांबत असायचा. त्यानंतर त्याने ओळख करून घेतली ओळख झाल्यानंतर तो घरी येऊ लागला आणि काही दिवसानंतर अल्पवयीन मुलीचे आई व भाऊ हे कामावर गेल्यानंतर तिला दमदाटी करायचा. आणि तिला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत राहायचा एक वर्षभर हे सगळं चालू होतं आणि एक वर्षभर अत्याचार केल्यामुळे तिला दिवस गेले पण या नाराधमाने त्या मुलीला धमकी देऊन तिचा गर्भपात केला.
त्या मुलाच्या अत्याचाराला, त्या त्रासाला ती कंटाळली आणि म्हणून तिने २ ते ३ महिने गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रीरामपूर मधील मुल्ला कटरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे समजतात तिने देखील धैर्य राहून पोलीस ठाण्यात जाण्याचे ठरवले.
26 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पप्पू उर्फ प्रशांत गोरे याच्याविरुद्ध भादवी कलम 376 2 जे. एन. अल्पवयीन मुलांचे संरक्षण कायदा कलम ३ ४ ५ जे २ ६ अन्वये गुन्हा दाखल केला.
यामध्ये त्या आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेतला तसेच तिला दिवस जाऊ पर्यंत अत्याचार केला. दिवस गेल्यानंतर ती घरी सांगेल यामुळे त्याने तुझ्या घरच्यांना जिवंत मारून टाकेल अशी धमकी देत गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. पण वैतागून अखेर तिने धाडस दाखवत या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.