यात्रेत फुगा आणायला गेली होती चिमुरडी,पण क्षणात तिच्यासोबत होत्याचं नव्हत झालं पहा सविस्तर.
अमरावतीमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. सर्व उत्सव सुरू झाले आहेत जत्रांना सुरुवात झाली आहे त्यामुळे जत्रांमध्ये देखील मोठी लगबग असते जास्तीत जास्त मोठी जत्रा भरवण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडे असतात. या जत्रांमध्ये गाडगे त्याचबरोबर लहान मुलांचे खेळणे, पाळणे, खाण्यापिण्याची दुकान आणि शॉपिंगची काय दुकान यांचा मोठा थाट असतो. अनेक मंडळी जत्रेसाठी गावात येत असतात. पाहुणे मंडळींची देखील लगबग सुरू असते.
प्रत्येक गावाला असलेल्या ग्रामदैवताची दरवर्षी एक यात्रा भरत असते. यात्रा हि गावाची शोभा असते आणि या यात्रेसाठी अनेकजण एकत्र जमतात आणि मोठ्या आनंदाने व उत्साहाने ह्या यात्रेचे सण साजरे करतात मात्र या यात्रेला गालबोट लागले. तानपुरा येथली अचलपूर तालुका अंतर्गत सिंधी बुद्रुक या गावात यात्रेचे आयोजन करण्यात आला होता. आणि याच यात्रेच्या आनंदावर विरजण पडले कारण या यात्रे मध्ये एक दुःखद घटना घडली. फुगा घेण्यासाठी चिमुकली गेली असतानाच गॅसचा फुगा फुगताना सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि यामध्ये या चिमुकलीचा पाय धडापासून वेगळा झालेला उपचारादरम्यान या चिमुकलीची प्राणज्योत मालवली.
आजोबा हे या स्फोटात जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जत्रेत गॅस फुगे विकणारा गॅस मध्ये अतिरिक्त प्रमाणात रसायने टाकल्यानं अचानक त्याचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये फुगा घेण्यासाठी गेलेल्या चिमुकली परी रोही हिचा पाय क्षणात धडापासून वेगळा झाला. प्रचंड दाब असलेल्या सिलेंडर मध्ये हवेत उडाला त्यानंतरच सलाब पडला.
अचानक झालेल्या स्फोटामुळे गावात एकच खळबळ माजली असून त्याच्या कडेवरती असलेली परी आणि तिचे आजोबा दोघेजण या अपघातामध्ये जखमी झालेत. परतवाडा शहरातील एका खासगी रुग्णालयांमध्ये परी आणि तिच्या आजोबांवर उपचार सुरू होते, मात्र स्फोटानंतर परिचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाला. अतिशय हसत खेळत असणाऱ्या चिमुकलीच अपघाती निधन झालं. अत्यंत दुर्दैवी क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यानं कुटुंबावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.