नगर : शनी अमावस्येने काळाचा घाला, नगर औरंगाबाद वरील खड्डे बुजवणाऱ्या मजुरांना…….. पहा सविस्तर.

नगर-पुणे महामार्गावरील दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतंय दररोज दिवसाला एक तरी त्या ठिकाणी मोठा अपघात होतो. आणि यामध्ये अशीच काही परिस्थिती आता नगर-औरंगाबाद महामार्गावर देखील झालेले खड्डे बुजवण्याचे काम करत असलेल्या मजुरांवर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने मजुरांना चिडवले.
पुढे जाऊन याच कंटेनर उभ्या असणाऱ्या टिपला देखील जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोन मजूर आणि एक कंटेनर चालक या तिघांचा मृत्यू झालाय शनि अमावस्या असल्याने या मार्गावर ती दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ होती. अपघात घडल्यानंतर दुचाकीवरील काही शनी भक्त तरुण आणि जखमींना मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले कंटेनर अडकला होता त्याला बाहेर काढून रुग्णवाहिकेत पाठवण्यात आला.
खड्डे बुजवण्याचा ठेका नगरच्या ठेकेदाराने जरी घेतला असला तरी सर्व मजूर नेवासा इथलेच होते. त्यानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती मात्र तरुणांच्या मदतीने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले मजूर हे नेवासा तालुक्यातील कांगोणी इथले रहिवासी होते. रमेश माने, ऋषिकेश निकम आणि कंटेनर चालक दादा खराडे हा साताऱ्याचा होता. मेहबूब संभाजी वायकर हे दोघे जण जखमी झाले आहेत.
कंटेनर भरधाव वेगानं नगर कडे जात असताना खड्डे बुजवण्यासाठी साहित्य घेऊन उभा असलेल्या टिपरला धडक दिली. त्यावेळी महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम करत असलेला मजुरांना या कंटेनर अंगावर चढवला. जखमी झालेल्या या मजुरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला. कंटेनर चालक हा गंभीर जखमी होता मात्र त्यानंतर त्याचा देखील मृत्यू झाला वेगाने चालवणार्या वाहनांवर ती नियंत्रण नसल्यामुळे अशा दुर्घटना घडतात, आणि यामध्ये निष्पाप लोकांचे जीव जातात. रस्त्यावरती काम करणाऱ्या मजुरांची कुठलीही चूक नसताना त्यांना आपला जीव गमवावा लागला.