मुलाने सून आणि सासऱ्याला नको त्या अवस्थेत पहिले; आणि ” असा ” घेतला बदला.
सासरा हा एक चांगल व्यक्ती असतो मात्र या बातमीतला सासरा हा नराधम निघाला त्याने आपल्या सुने सोबत जे केल ते तर चुकीच मात्र सुनेच्या प्रेमात पडलेला हा सासरा आपल्या मुलाच्या जीवावर उठला आणि सासरा सुनेने त्या मुलाचा जीव घेतला राजस्थानमधील अलवरमध्ये मागील वर्षी एक भयानक घटना घडली होती. सुनेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या वडिलांनी मुलाची हत्या केली. व्यापारी वडील रात्री आपल्या सुनेला भेटायला आले होते.
यादरम्यान मुलाने पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे पाहून तरुणाला खूप राग आला आणि तो रागाच्या भरात आपल्या खोलीत गेला. त्यानंतर दोघेही मुलाच्या मागे गेले आणि त्याच्या खोलीत पोहोचले. सासरे आणि सुनेने मिळून तरुणाचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितलं.मृत विक्रम सिंहचे वडील आणि मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. मयताने वडील आणि पत्नीला संशयास्पद अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून त्याचा खून केला.
5 मार्च रोजी पत्नी आणि मुलांसोबत जेवण करून विक्रम सिंह झोपी गेला. सकाळी पत्नीने पती विक्रम सिंह हा बेडवरून खाली पडला असं भासवलं. यानंतर मृताचे वडील बलवंत सिंग आणि इतर कुटुंबीयांनी विक्रम सिंग यांना बेडवरून उचलून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृताचे नातेवाईक गुपचूप त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते, मात्र त्याआधीच एका फोन कॉलने संपूर्ण गूढ उघड केले.एसपींनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टम केले असता,
अहवालात मानेवर साडीच्या खुणा आणि डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्या. मृताची पत्नी पूजा हिची चौकशी केली, त्यानंतर तिने सर्व कबूल केलं. आरोपी बलवंत याच्या पत्नीचे २०२० मध्ये निधन झाले होते. यानंतर त्याचे सुनेसोबत अनैतिक संबंध होते. हत्येच्या दिवशी रात्री मयत विक्रमने वडील बलवंत आणि पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे प्रकरण उघडकीस येण्याच्या भीतीने बलवंत सिंग आणि सून पूजा या दोघांनीविक्रम सिंगचा गळा दाबून खून केला आणि त्याला आत्महत्या केल्यासारखे भासवण्यासाठी पंख्याला लटकवले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.