जरंडी गावात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला पाच जणांना चावा. पहा बातमी सविस्तर.

जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळच्या सुमारास पाच जणांना चावा घेतल्याने गावात दहशद निर्माण झाली होती पाच पैकी तीन जणांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
जरंडी येथील फरहन शफीक शेख , व यग्नेश गुरुदास पाटील या लहान बालकांना डोक्याला, तोंडाला, व कानाजवळ पिसाळलेल्या कुत्र्याने गंभीर चावा घेऊन गंभीर जखमी केले तसेच संजय जगताप यांना पण हाताला चावा घेऊन जखमी केले यांना लगेच रुग्णवाहिके द्वारे जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्यावर तिथे उपचार सुरु आहेत साधनाबाई भगवान गायकवाड यांच्यासह एकास पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे
पिसाळलेल्या कुत्र्याने जरंडी गावात दहशदनिर्माण केलेली असून अजूनही गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशद असून कुत्रा अजूनही मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण आहे