स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीत स्वातंत्र्य सैनिकांना मोफत आरोग्य सेवा – डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील सामाजिक वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील उतूंग व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी एक नवीन स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमीमध्ये म्हणजेच पिंपळनेर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी सर्व रुग्णांसाठी सूख-सोयी उपयुक्त हॉस्पिटल आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी मोफत आरोग्य सेवा अविरतपणे देण्यासाठी हॉस्पिटल निर्माण केले आहे या हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वीर पत्नी यांना अविरतपणे मोफत आरोग्य सेवा देण्याचे डॉक्टर जितीन वंजारे यांनी ठरवले आहे.
स्वातंत्र्यसैनिक कै.सुखदेव जायभाये यांच्या स्मतीप्रित्यर्थ मौजे पिंपळनेर या ठिकाणी भाऊ बाबा मंदिरा पाठी, इंदूवासिनीदेवी रोडलगत भव्य दिव्य अशा पद्धतीचे सर्व सुविधा उपलब्ध असणारे हॉस्पिटल डॉक्टर जितीन वंजारे आणि नवनाथ जायभाये यांनी चालू केले असून या हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या वीर पत्नी यांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे तसेच या हॉस्पिटलचे नाव स्वतंत्र सैनिक कैलासवासी सुखदेव जायभाय हॉस्पिटल असे ठेवण्यात आलेले आहे पिंपळनेर परिसरामध्ये रात्री अपरात्री आरोग्य सेवा उपलब्ध नसल्या कारणाने रुग्णांचे हाल होत आहेत योग्य वेळी आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे काही पेशंटच्या जीवाला धोकाही निर्माण होत आहे अशा परिस्थितीमध्ये पिंपळनेर भूमीपुत्र नवनाथ जायभाये व डॉ जितीन वंजारे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य सैनिक कै.सुखदेव जायभाये हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे आणि तिथे अविरत दिवस-रात्र सेवा देऊन गोरगरीब जनतेसाठी अगदी अत्यल्प दरात सेवा पुरवण्याचे काम कै. सुखदेव जायभाये हॉस्पिटल करेल.
या हॉस्पिटल साठी कन्सल्टिंग पँनल म्हणून डॉ दत्तात्रय जवरे,डॉ. निलेश गोल्हार आणी डॉ सोनम गोल्हार यांच्या पण व्हीसिट होणार आहेत. कोविड सारख्या अती क्रीटिकल परिस्थितीमध्ये डॉक्टर जितीन वंजारे यांनी मोफत आरोग्य शिबीर घेऊन गावोगावी सेवा दिली, आरोग्य सप्ताह आयोजित केले,लोकांना दान धर्म करता करता आरोग्य सेवाही मोफत दिली आणि हाच सामाजिक दृष्टिकोन लक्षात ठेवून पिंपळनेर येथे ईतर रुग्ण सेवेबरोबर स्वातंत्रसैनिक व त्यांच्या वीरपत्नी यांना मोफत आरोग्य सेवा देण्याचे आश्वासनही डॉ जितीन वंजारे यांनी दिले आहे.खेडो-पाडी मुळ आरोग्याच्या समस्या असून येथील गरीबी ,दारिद्र्य, मागासपण,दळणवळण व वाहनांचा अभाव इत्यादी गोष्टीचा विचार केल्यास खरी सेवा देण्याची गरज खेडोपाडी असून सामाजिक दृष्टीकोन लक्षात ठेऊन आपणही सेवा देऊ असे यावेळी डॉ वंजारे यांनी नमूद केले.
स्वातंत्र्य सैनिकांना मोफत आरोग्यसेवा देणारे हे महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल असून परिसरातील स्वतंत्रसैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ जितीन वंजारे आणि नवनाथ जायभाये यांनी केले आहे. संबंधित हॉस्पिटल चे उद्घाटन महंत १००८ महामंडलेश्वर त्रीविक्रमांनंद महाराज इंदुवासिनी देवस्थान पिंपळनेर व सिध्देश्वर संस्थान शिरूर कासार चे महंत हभप विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गोपालक शबिर मामू आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक दीपकदादा नागरगोजे, गजानन साखर कारखाना चे चेअरमण रविंद्रदादा क्षीरसागर, नेते सुरेश उगलमुगले, नेते किशोर कागदे, शिरूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी अशोक गवळी, डॉ सचिन पालवे,डॉ अविनाश फुंदे, सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी,वकील बी बी जायभाये, विठ्ठलनाना तांबे,डॉ असोसिएशन चे बीड अध्यक्ष डॉ लक्ष्मण जाधव, शिरूरचे डॉ बडजाते,डॉ अनिल बडे, मार्गदर्शक डॉ जवरे,डॉ.निलेश गोल्हार, डॉ.रमेश शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.तरी या उद्घाटन सोहळ्याला पिंपळनेर परिसरातील मित्रगण,नातेवाईक,रुग्ण,सर्वांनी ऊपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी डॉ जितीन वंजारे,नवनाथ जायभाये, उध्दव दहिफळे यांनी केले आहे.