नियतीचा खेळ : पतीची साथ सुटली, ६ महिन्यातच लेकाला गंभीर आजार, आईने ऑपरेशनसाठी १५ लाख उभे केले पण…

” इस दुनिया में सबसे बडी योद्धा मा होती है ” हे जरी सिनेमातले डायलॉग असले तरी आई ही आईच असते. आपल्या लेकरासाठी ती काही ही करू शकते. एक म्हातारी आई आपल्या मुलाला मृत्युच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी जे केलं हे फक्त एक आईच करू शकते.याच ज्वलंत उदाहरण बारामतीत पाहायला मिळालं आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असतानाही चक्क १५ लाख रुपयांची जमवा जमव करुन तिने ऐन तारुण्यात आलेल्या मुलाची आजारातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नियतीला मान्य नव्हतं,
आपल्या पतीच्या निधनानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या अंतरावरच आपल्या एकुलता एक मुलाचं निधन झाल्यानं शालनबाई शिवाजी वाईकर या ६० वर्षीय वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शालनबाई वाईकर या वृद्ध आई समोर सून व तीन नातवंडांचा संभाळ कसा करावा असा पेच निर्माण झाला आहे.शालनबाई वाईकर यांचे पती शिवाजी वाईकर यांचे मागील सहा महिन्यांपूर्वीच लिव्हर निकामी झाल्याने निधन झाले. दरम्यान, त्यांचा मुलगा रविराज यालाही लिव्हरचा असह्य त्रास होऊ लागला.
शालनबाई यांनी पतीनंतर कर्ता पुरुष असलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाला स्वतःची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही दवाखान्यासाठी समाजाकडून दोन लाख रुपये रुपये आर्थिक मदत गोळा केली. बारामतीसह पुण्यातील विविध रुग्णालयात रविराजवर उपचार सुरु केले. रविराजच्या उपचारावर दररोजचा ७० ते ८० हजार रुपये खर्च करण्यात आला. तब्बल १५ लाख रुपये खर्च करुन ही रविराजचा जीव वाचू शकला नाही.
मुलगा आणि पती गेल्याने सून आणि नातवंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शालनबाई शिवाजी वायकर यांच्यावर आली आहे. जवळचा सर्व पैसा उपचारावर खर्च झाला. उर्वरित बिलाच्या कारणास्तव बील कसे भरायचे, असा पेच निर्माण झाला होता. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सदर रुग्णालयाचे बिल भरले.पण आता पुढे काय पती गेले ,मुलगा गेला एक म्हातारी आई कुटुंबाचा सांभाळ कसा करणार ?