नगर ब्रेकिंग : सीना नदीत एक व्यक्ती वाहून गेला, नगर महापालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर.
गेल्या अनेक दिवसांपासून सीना नदी ही सातत्याने ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने होणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. अहमदनगर कडून कल्याण कडे जाणाऱ्या भागात जाणारी वाहतूक ही ठप्प होते. तर कल्याणहून अहमदनगर शहरात किंवा पुढे अनेक जिल्ह्यांना जोडणारी वाहतूक ही ठप्प होते.
आज दहा वाजल्यापासूनच सीना नदीला पूर आला होता, दिवसभर हा पूर होता आणि त्यामुळे बरेच जण आपली वाहन घेऊन त्या ठिकाणी येत होते. आणि माघारी फिरून पुन्हा पर्यायी मार्गाने जात होते. अहमदनगरच्या बाजूला आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर महानगरपालिका आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. मात्र कल्याण कडून येणाऱ्या बाजूला कुणीही त्या ठिकाणी महानगरपालिका, प्रशासन दाखल नव्हतं, बॅरिगेट नव्हते.
आणि त्यामुळे तिथे जवळपासचे रहिवासी असणारी लहान मुलं पुराच्या पाण्यात खेळत होते. वाहनधारक सुसाटपणे येत होते पूर पाहत होते फोटोशूट करत होते आणि पुन्हा निघून जात होते. तिथे पोलीस प्रशासन असतं तर कदाचित अशा दुर्घटना घडल्या नसत्या कारण या ठिकाणी भर पाण्यातून एक व्यक्ती चालत निघाला आहे जो कल्याणकडील बाजूने निघत अहमदनगरच्या बाजूने जात असताना दिसत आहे.
कल्याण रोड कडील बाजूला ना बॅरिगेट लावलेले आहेत न कोणी प्रशासन अधिकारी आणि यामुळे अशी घटना नगरमध्ये घडली आहे. त्या ठिकाणी जर पोलीस प्रशासन असतं, बॅरिगेट असते तर खऱ्या अर्थाने तिथे हा अनर्थ टळला असता. मात्र पुरात चालत जाण्याचा हा Stunt करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. आणि हीच स्टंटबाजी या व्यक्तीच्या अंगलट आलेली आहे कारण हा व्यक्ती सीना नदीच्या पुरात वाहून गेला आहे.
स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आज एक व्यक्ती वाहून गेलेला आहे. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असते, आपत्ती व्यवस्थापन असते तर कदाचित त्या व्यक्तीला त्यांनी रोखलं असतं आणि असं कृत्य करण्यापासून वाचवलं असतं. मात्र त्या ठिकाणी यंत्रणाच उपस्थित नसल्याने नाहक या व्यक्ती वाहून गेला आहे. आणि या ठिकाणी कुठेतरी महानगरपालिकेचे अपयश दिसून आला आहे.