Viral : शिवीगाळ करून कंडक्टरला कामावरून काढल्याने पहा या कंडक्टरने कसा बदला घेतला.
सतना इंदूर मार्गावर धावणाऱ्या या बसची सध्या संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे. खरं तर ही बस ज्यांनी ज्यांनी पाहिली ते काही क्षण थांबून या बसचा बोर्ड आवर्जून वाचताना दिसले. अनेकांना या बसचा व्हिडीओ पाहून हसू अनावर झाल्याचं चित्र इंटरनेटवर पहायला मिळत आहे. या बसचे मालक भाजपाचे नेते सतीश सुखेजा आहेत. या बसचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुखेजा यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आता अगदी पोलीस स्थानकापर्यंत हे प्रकरण जाण्यामागील कारण म्हणजे या बसच्या बोर्डवर कर्मचाऱ्याने रागाच्याभरात लावलेला आहे .
बॉस आणि कर्मचारी या नात्यातले मतभेद अनेकदा दोघांनाही त्रासदायक ठरु शकतात. मात्र या नात्यात कधीतरी एखाद्या गोष्टीवरुन व्यक्ती एवढ्या टोकाला जातो की समोरच्याला धडा शिकवण्यासाठी काहीही करु शकतो.रविवारी हा प्रकार सतना बस स्टॅण्डवर घडला. सुखेजा ट्रॅव्हल्सची बस नेहमीप्रमाणे बसस्थानकावर उभी होती. मात्र या बसच्या पुढील भागामध्ये ज्या ठिकाणी बसच्या मार्गाबद्दलची माहिती दिलेली असते.
तिथे एलईडी इमेजवर बसच्या कंपनीच्या मालकाचं नाव आणि त्या आधी शिवी दिल्याचा मजकूर झळकत होता. विशेष म्हणजे हा मजकूर बसच्या दर्शनी भागात झळकत असल्याची माहिती चालकालाही नव्हती आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही नव्हती.जेव्हा या बससमोर लोकांची गर्दी झाली आणि चर्चा होऊ लागली तेव्हा कर्मचाऱ्यांनी तातडीने हा डिस्प्ले बोर्ड बंद केला. मात्र तोपर्यंत या बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती. मात्र हा प्रकार म्हणजे मालकाला शिवीगाळ करण्याच्या उद्देशाने केला होता की इतर काही हेतू होता हे लगेच स्पष्ट झालं नाही.
या प्रकरणामध्ये मालक सतीश सुखेजा यांनी कोलगवा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली असून हा प्रकार कंपनीमधील एका माजी कर्मचाऱ्याने केला असावा अशी शंका व्यक्त केली आहे. एका दाव्यानुसार या कर्मचाऱ्याने डिस्प्लेसाठी वापरल्या जाणाऱ्या सीपीयूचा पासवर्ड बदलला असून हा सीपीयू जवळजवळ ५५ हजारांचा आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्याचा शोध घ्यावा लागणार किंवा सीपीयू बदलावा लागणार हे दोनच पर्याय मालकासमोर असल्याचं सांगितलं जात आहे.