जामखेड येथे हजरत टिपू सुल्तान जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
जामखेड तालुका प्रतिनिधी,
जामखेड शहरातील खर्डा चौक येथे भारताचे स्वातंत्र्य सेनानी, शहीद ए वतन फतेह अली खान हजरत टीपू सुल्तान(र.अ.) यांची २७२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी जामखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.मधुकर राळेभात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हजरत टिपू सुल्तान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच हजरत टिपू सुल्तान यांचे विचारधारेचा ऊपस्थितांना परिचय करून देण्यात आला. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी हजरत टिपू सुल्तान यांच्या जीवनावर प्रकाश टाकत भाषणे केली.
याप्रसंगी जेष्ठ नेते महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष शेरखान, राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष उमर कुरेशी,जमीर सय्यद, प्रा .कैलास माने,मंगेश आजबे,वसीम बिल्डर कुरेशी, राजेंद्र गोरे, प्रा.लक्ष्मण ढेपे, पाटोदाचे संरपच समीर पठाण अकबर सय्यद,अवधूत पवार,कुंडल राळेभात, कांँग्रेस चे राहुल उगले ,वसीम कुरेशी,जुबेर शेख,पापा शेख, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, लहु पवार, चाँद तांबोळी, वसीम मंडप, प्रा. जुल्फीकार पठाण, प्रा.सुनिल जावळे, प्रा.राहुल आहिरे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे ता.अध्यक्ष उमर कुरेशी व सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद, बी.ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जाकीर शेख यांनी केले तर आभार जमीर सय्यद यांनी मानले.