...
पश्चिम महाराष्ट्र

विज चोरी वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आरोपी फरार.

जामखेड तालुका प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील गरडाचे पाटोदा येथे महावितरण कंपनीच्या विजेच्या साहित्याचे कुठे नुकसान झाले आहे का? किंवा कोणी बेकायदेशीर वीज वापर करत आहेत का हे पाहण्यासाठी गेलेले जामखेड उपविभागातील अरणगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता पुष्कराज मेंगाळ व वरिष्ठ तंत्रज्ञ विठ्ठल शिवाजी खुणे यांना विजेचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांनी घाण घाण शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली यावरून आरोपी विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे जामखेड उपविभागातील अरणगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता पुष्कराज मेंगाळ व वरिष्ठ तंत्रज्ञ विठ्ठल शिवाजी खुणे हे दोघे दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आकरा वाजताचे सुमारास आपल्या कार्यक्षेत्रातील पाटोदा (ग) या गावातील लाईटचा खांब कोठे जमिनीवर पडला आहे काय, कोणाचे फॉल्टी मीटर आहे काय याची तपासणी तसेच कोणी लाईटचे तारेवरून अथवा खांबाजवळून अनाधिकृत आकडा टाकून लाईट वापरत आहे का याबाबतची खात्री करून त्यांचेवर कारवाई करणे करीता व शासकिय काम करणेकरीता गावात पायी चालत खात्री करत होते.

पाटोदा ते अरणगाव जाणारे रोडलगत पायी चालत असताना अरणगावकडे जाताना डावे बाजूला लाईटचे तारेवरून कोणीतरी आकडा टाकलेला त्यांना दिसला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जावून आकड्याची खात्री केली असता तारेवरील आकडा टाकलेली वायर ही एका पञ्याचे टपरीच्या आत गेलेली दिसली. ती टपरी उघडी असल्याने त्यांनी आत मध्ये जावून पाहीले असता सदर आकडा टाकलेल्या वायरचे पुढे एक बल्ब लागलेल्या स्थितीत दिसला व त्या टपरीमध्ये एक इसम बसलेला दिसला म्हणून त्यांनी त्या इसमास स्वतःचा परिचय दिला व त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव इरफान पठाण असे सांगितले असता. सहाय्यक अभियंता मेंगाळ व कर्मचारी खुणे हे त्यांस, तुम्ही असे अनाधिकृत लाईटचा आकडा टाकून लाईट का वापरता असे विचारले असता तो इसम म्हणाला की, तुम्ही कोण मला विचारणारे, तुम्हाला कारवाई करायची असेल तर शेतात जा, दुस-यांचे लाईट चे आकडे पहा असे म्हणून मेंगाळ यांना घाण घाण शिवीगाळ केली त्यावर त्यांनी त्यांस समजावून सांगत आम्ही – शासकिय कामे करत आहोत.

आम्हाला शासकिय कामे करत असताना कोणता अडथळा आणू नका असे सांगत त्याने मेंगाळ यांची गचांडी धरून जमीनीवर खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करून तु येथून कसा जातो. हे पाहतो असे म्हणून त्यांने आणखी दोन जनांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर तेथे दोन इसम आले व त्यांनी काही एक विचार न करता त्या दोघांना घाण घाण शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली व इरफान पीरखान पठाण यांने टपरीजवळ पडलेल्या दगड हातात घेवून मेंगाळ यांच्या पाठीवर व हातावर मारहाण केली असून तेथून ते दोघेही कर्मचारी जवळच असणारे ओळखीचे गफार पठाण यांचे दुकानावर पळत गेले व टपरीजवळ जावून थांबले त्यानंतर तेथे लोक गोळा झाल्याने तेथेही त्यांना शिवीगाळ व लाथाबुक्याने मारहाण केली असून तेथे उपस्थित माजी उपसरपंच गफार पठाण, गौतम हिरामण काळे व इतर लोकांनी सोडवा सोडवी केली सदर ठिकाणी बरेच नागरिक जमा झाल्याने तेथून वरील तिघेजण निघून जावू लागले व जाताना आम्हाला म्हणाले की, तुम्ही आज वाचलात, परत सापडलास तर जिवे मारत असतो. असे म्हणून निघून गेले

यानुसार विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पुष्कराज मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी इरफान पीरखान पठाण, पीरखान ईस्माईल पठाण, सादफ ईब्राहीम पठाण सर्व रा. पाटोदा (ग), ता. जामखेड यांचे विरुद्ध भा. द. वी. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!