इंदिरानगर गुलटेकडी औधोगिक वसाहत येथे आरोग्य शिबीर संपन्न.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
गुलटेकडी महर्षिनगर भागातील नागरीकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहण्यासाठी इंदिरानगर गुलटेकडी वसाहत भागातील सर्वांनसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन गणेश शेरला व गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले.
काल दिनांक 16/12/22 रोजी गुलटेकडी येथे एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 300 हुन अधिक जेष्ठ नागरीक,महीला ,पुरूष व मुले यांनी लाभ घेतला.निरोगी राहण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व औषध उपचार करण्यात आले.
यावेळी शिबीराला भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट दिली मनोज कांबळे,रवि जाधव,सचिन खंडागळे,गणेश शिवशरण,राहुल राजभर,नजीर शेख,संजय साठे,विठ्ठल शिवपालक,अनिल पवार,मारूती कांबळे,महेश सांळुखे यांनी वस्तीतील शिबीरास आवर्जुन भेट दिले व वस्तीतील आरोग्य शिबाराचे कौतुक केले.
अश्या आरोग्य शिबीराची आपल्या भागात गरज आहे अनेक नागरीकं शिबीरात स्वताहुन सहभागी झाले यांचे समाधान आहे प्रभागातील विविध ठिकाणी असे शिबीर पुढील काळत घेऊन नागरीकांचे आरोग्य उत्तम कसे राहील याबाबद काळजी घेऊ माझ्या भागातील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संपर्क करून आरोग्य शिबीर वाढवण्यात येतील असे मनोगत गणेश शेरला व्यक्त केले.
आजच्या आरोग्य शिबीरास सहकार्य एकता सेवा प्रतिष्ठाण यांनी केले.