हृदयद्रावक : कार रेसिंग ची पैज लावली, हि पैज एका लहान मुलाच्या जीवाशी बेतली. पहा सविस्तर.
पैंज लावणं हे अत्यंत घातक ठरू शकतात. पैंज लावल्यानंतर ती पैंज कधी कधी पैज लावणाऱ्यांचे जीवावर भेटते. तर कधी नाहक एखाद्याचा बळी देखील जातो. तरुण पिढीमध्ये पैज लावण्याचे अनेक प्रकार असतात. पैज लावण्याचे काही खेळ देखील असतात. या पैजेमुळे नाहक एखादयाचा जीव जाऊ शकतो. ही गोष्ट अत्यंत खेदाची आहे.
दोन कार मध्ये रेस लागली होती, आणि याच रेस मध्ये एक चिमुकला अकरा वर्षाचा विक्रांत मिश्रा याचा कारखाली चिरडून मृत्यू झाला. विक्रांत सायकल वरती होता. या दोन कारमध्ये शर्यत लागली होती हीच शर्यत विक्रांच्या जीवावर बेतली , या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. विक्रांतला धडक देणाऱ्या कार मधील तिघा जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला.
जळगाव शहरातील मेहरून ट्रक परिसरात हा अपघात घडलाय. विक्रांत मिश्रा हा वडील संतोष मिश्रा आणि आई यांच्यासोबत एकनाथ नगर येथे वास्तव्य करत होता. विद्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता चौथीत विक्रांत शिकत होता. रविवारची सुट्टी असल्यामुळे विक्रांत खेळत होता. मेहरून ट्रॅकवर त्याचा काकाचा मुलगा याच्यासोबत तो गेला होता.
दुपारी ०३:३० वाजण्याच्या सुमारास मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये रेस लागली होती. या रेसमधील एक कारने (क्रमांक- एमएच १९ बीयू ६००६) विक्रांतला जोरदार धडक दिली. या धडकेत विक्रांत हा जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, विक्रांत हा चेडूंसारखा १२ ते १५ फूट वर उडाला होता. त्याची सायकल झाडावर अडकली होती. घटना घडल्यानंतर जवळल्या नागरिकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
निष्पाप या चिमुकल्याचा या शर्यतीमध्ये जीव गेला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आई ने हंबरडा फोडला. डोळ्यासमोर हसत खेळत असणार लेकरू क्षणात नाहीसे झाले. हा धक्का या कुटुंबाला सहन होण्याच्या पलीकडे आहे. आपण ही वाहन चालवात असाल किंवा अशा शर्यतीन मध्ये सहभागी घेत होत असाल तर पूर्णपणे विचार करा, आपल्या मुळे कुणाचा जीव जायला नको.