” ज्याचं बँक मधी खात नाई त्यालाबी इडी लागती, मला एकदा तर…!” आ निलेश लंके यांची ED वर टिकास्त्र.
कोरोना सारख्या महाभयंकर काळामध्ये हे आमदार जास्तीत जास्त रुग्णांची सेवा करत होते. त्यामध्ये सगळ्यात वरच्या लिस्टमध्ये जे नाव होतं ते म्हणजेच पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, यांच्या कामाच्या पद्धतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे छाप होती. अत्यंत सोयीस्कर अशा सर्व सेवा ते कोरोना रुग्णांना पोहोचवत होते. त्यांची योग्य ती काळजी घेतली जात होती. त्यांना एकटेपणा जाणू नये यासाठी मनोरंजनही होते आणि याचमुळे राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये आमदार निलेश लंके हे अग्रेसर आहेत असं दिसत होत. आणि त्यामुळेच आमदार निलेश लंके हे सर्वांच्या गळ्यातलं ताईत बनले. हेच आमदार निलेश लंके आता राजकारणातल्या घडामोडींमध्ये देखील सहभाग घेतात आणि आपल्या प्रतिक्रिया देतात.
देशभरातील विरोधी पक्षांनी ईडीच्या कारवाईचा धसका घेतल्याचे पाहायला मिळते. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक हे ईडीच्या अटकेत आहेत. खासदार संजय राऊत यांना देखील अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस इडीच्या कारवाईनंतर केंद्र सरकार वरती आता जोरदार टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पांढरे आमदार निलेश लंके यांनी कारवाई बद्दल बोलताना म्हणाले की, ज्या माणसाचं बँकेत अकाउंट नाही त्याच्या मागे देखील ED लागते.
ईडीचं लय अवघड आहे, पाच सहा वर्षापूर्वी मला विचारलं असतं ईडी काय आहे तर मला पण सांगता आलं नसतं. मला ईडी काय असते ते २०१९ मध्ये माहिती झालं, असं निलेश लंके म्हणाले. निलेश लंकेंनी ईडीवर टीका करताच मंचावरील एका व्यक्तीनं म्हटलं की, आमच्याकडे पिठाची गिरणी पण नाही ईडी कशी लागेल, त्यावर निलेश लंके यांनी पिठाची गिरणी काय ज्याचं बँकेत अकाऊंट नाही त्याला ईडी लागते, असं निलेश लंके म्हणाले.
पुढे ते म्हणाले की जेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा मी बँकेचे खाते उघडलं, मार्च महिन्यात मला आणि सुनील शेळके यानाही ED लागली होती. माझ्या चौकशीला डायरेक्ट पंजाब आणि हरियाणा मधले पथक आलं होतं. मला एक दिवस एका अधिकाऱ्यांन त्याबाबत विचारलं मी त्यांना म्हटलं की एखादा अधिकारी माझ्याकडे चौकशीला आला. तर शंभर टक्के मलाच पैसे देऊन जाईल असे ते हसत हसत म्हणाले.
सध्या चुकीच्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी कुठल्याही पातळीला जाण्याचा प्रयत्न सध्याचे राजकारणी करतात. असं म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्यातील कडा या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात या नोकरी महोत्सवांमध्ये ते बोलत होते.