आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा ! उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाजूला पाहा काय होत ठेवलेल…
रुग्णालयांच जाळ दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी रुग्णालयात झटपट उपचार होतो म्हणून तिकडे कल वाढला आहे. शहरात तर खाजगी रुग्णालय पहिली पसंदी असते. कारण महापालिका किंवा जिल्हा रुग्णालय फारसा योग्य प्रकारचा उपचार करत नाही अस म्हंटल जात आणि त्यात काही वावगं नाही कारण वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात एका रुग्णाचा मृतदेह तब्बल 12 तास इतर रुग्णांसोबत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसई गावातील डि एम पेटिट रुग्णालयात हा प्रकार घडला असून या प्रकारावरून इतर रुग्णांमधून संताप व्यक्त केला जात आहे. उपचार सुरू असलेल्या या रुग्णाचा रात्रीच मृत्यू झाला होता. मात्र रात्रीपासून सकाळपर्यंत हा मृतदेह एकाच रूममधील इतर रुग्णांसोबत ठेवण्यात आला होता.
रुग्णालयात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेले धीरज वर्तक या दक्ष नागरिकाने हा संतापवजनक प्रकार पहिला आणि तो आपल्या मोबाईल कमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या प्रकाराबाबत रुग्णालयात प्रसाशनाशी संपर्क साधण्यात आला मात्र तो होऊ शकला नाही. हा दवाखाना रुग्णांच्या जीवाशी असा किती दिवस खेळणार आहे या ठिकाणी मुर्दाघर नाही का या ठिकाणी हे शव हलवण्यात यायला हवं होतं. मात्र तसं न करता एका उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या बाजूला या पद्धतीने मृतदेह ठेवणे, अत्यंत चुकीचा आहे आता यावर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे