हृदयद्रावक : आता ते दोघे कधीच पोलीस दलात भरती नाही होऊ शकणार ?
कित्येक तरुण हे लहानपणापासूनच मनाशी एक स्वप्न बाळगून असतात. त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना पोलीस, आर्मी, नेव्ही व इतर क्षेत्रांची आवड लागलेली असते. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न असतील जे काही गोष्टी असतील त्या पूर्ण कशा करता येईल यामागे ती लागलेली असतात. यामध्ये बऱ्याच जणांची स्वप्न पोलीस दलामध्ये भरती व्हायचे असते. म्हणून शालेय शिक्षण घेत असताना शिक्षणासोबतच पोलीस भरतीत भरती व्हायचं म्हणून सकाळी लवकर उठून धावणे त्याचप्रमाणे वेगवेगळे व्यायाम करणे अशी काम चालू असतात.
अशीच एक घटना आपल्या महाराष्ट्रामधील हिंगोली या ठिकाणी घडली आहे. हिंगोली मधील दोन तरुण देखील आपले पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून पहाटे व्यायामासाठी जातात. ते व्यायाम करत असताना त्या दोन तरुणांसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आणि याबाबतीतला तपास पोलीस करत असल्याची माहिती मिळाली आहे.
ही दोन तरुण आज पहाटे पाचच्या दरम्यान भरतीची तयारी करण्यासाठी म्हणून सकाळी व्यायामासाठी जातात. व्यायामावेळी त्यांच्यासोबत एक वाईट घटना घडते. ती म्हणजे एक अज्ञात वाहन त्या दोघांना उडवून देते व त्या घटनास्थळावरून प्रसार होऊन निघून जाते. या दोन तरुणावर काळाने घाला घातल्याने हिंगोली करांची आजची सकाळ ही दुःखद सकाळ झाली. हे दोन तरुण वसमत शहरांमध्ये राहणारे असून पोलीस भरतीची तयारी करत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
ही घटना पहाटे पाचच्या दरम्यान घडली. अनिल भगवानराव आमले ( वय 24 रा. कृष्ण मंदिर, कवठा रोड, वसमत. ) व गणेश परमेश्वर गायकवाड ( वय18 रा. पौर्णिमा नगर, वसमत ) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. ही घटना घडल्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह विच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे पुढील तपास वसमत ग्रामीण पोलीस हे करत आहेत.
अशी धक्कादायक घटना घडल्यानंतर वसमत शहरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे अशा घटना यापुढे घडू नये म्हणून वीट भट्टी रोडवर ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे. या दोन्ही तरुणांची पोलीस भरती मधील स्वप्न हे अपूर्णच राहिले. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी पोलीस भरती होणार म्हणून जाहीर केले होते. आणि आता आपल्याला पोलीस व्हायच आहे यामुळे अनेक तरुण सकाळी व्यायामासाठी जात असतात. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहनांची वर्दळ असते आणि अशा रस्त्यांवर तरुणांनी व्यायामासाठी जाण्याचे टाळावे किंवा व्यायाम व रनिंग करायची असेल तर ज्या ठिकाणी जास्त वर्दळ नाही किंवा मोकळे पटांगण आहे याचा वापर करावा असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.