हृदयद्रावक ! सोफ्याने घेतला चक्क 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; पाहा नेमकं काय घडलं.
एका बाळाचा मृत्यू होण हे आई वडिलांसाठी खूप वेदनादायी असत ,मात्र नियतीच्या मत काही वेगळच होत,कारण एका सोफ्याने 11 महिन्यांच्या बाळाचा जीव घेतला आहे. मृत मुलाच्या आईनेच आपल्या बाळाच्या मृत्यूचीभयानक आणि वेदनादायी कहाणी सांगितली आहे. जी वाचूनच अंगावर काटा येईल.आमचा दुसरा मुलगा राइडरच्या जन्मानंतर आम्ही दोघं याच वर्षात एप्रिलमध्ये नव्या आणि मोठ्या घरात शिफ्ट झालो. पण 8 मे 2022 हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस. यादिवशी सर्वकाही उद्ध्वस्त झालं”
त्या दिवशी दुपारी सर्व काम केल्यानंतर मी घराचे सर्व दरवाजे बंद करत होती. तेव्हा राइडर तिथं होता. एका मिनिटासाठी मी टॉयलेटला गेले. मला खेळणं पडल्यासारखा आवाज आला. तेव्हा माझी मोठी मुलगी ऑब्रियेना राइडरला हाक मारत टॉयलेटपर्यंत आली. नंतर आम्ही घरभऱ शोधलं पण राइडर कुठेच दिसला नाही. मी खूप घाबरले”मला काहीच समजत नव्हतं. शेवटी मी माझ्या घरातीलसोफ्याजवळ गेले. आम्ही तो सोफा गेल्या वर्षीच घेतला होता. तो एक इलेक्ट्रिक रिक्लाइनर सोफा होता.
जो बटणाने कंट्रोल होत होता. मी सोफ्याचं बटण दाबलं आणि सोफा पूर्ण उघडला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या काळजाचा तुकडा सोफ्याच्या रिक्लाइनिंग पाइपमध्ये अडकला होता. त्याचा चेहरा निळा पडला होता. तो इथं अचानक कसा आला, हे सर्व काय झालं काहीच समजत नव्हतं”
अद्यापही निकाइला आणि तिचं कुटुंब या धक्क्यातून सावरलं नाही आहे. आपल्या मुलांबाबत असा निष्काळजीपणा करू नका, असं आवाहन त्यांनी इतर पालकांना केलं आहे.