व्हाईट कॉलर

त्यांच्या आजोबांनी भुईदंडाने पाणी आणण्याच्या भूलथापा देऊन फसवले – आ. निलेश लंके यांचा विखेंवर हल्लाबोल.

पारनेर, प्रतिनिधी.

गेली पन्नास वर्षे विखे परिवाराने संपूर्ण नगर जिल्ह्याला झुलवत ठेवले. पारनेरसह नगर, पाथर्डी तालुक्यात कुकडी प्रकल्पाचे पाणी भुईदंडाने आणू अशा वल्गना खा.सुजय विखे यांचे आजोबा माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी चाळीस वर्षे केल्या.मात्र ते साध्या नळानेही पाणी आणू शकले नाहीत.अशी घणाघाती टीका आमदार नीलेश लंके यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. टाकळीढोकेश्‍वरच्या सरपंच अरूणा खिलारी अध्यक्षस्थानी होत्या.

आ. लंके म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला.आजही सुमारे साडेतिनशे कोटी रूपयांचा निधी रोखला आहे. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे,मी सोपा नाही,लोकसभेचे मतदान झाल्यानंतर रोखलेला निधी मिळालेला असेल.असे आ.लंके यांनी ठणकावून सांगितले.

मला विधानसभेत पाठविल्यानंतर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. साडेचार वर्षांच्या कालखंडात सर्वाचे समाधान करू शकलो नसलो तरी संपूर्ण कार्यकाळात रात्रंदिवस परीश्रम घेतले.मतदार संघाला न्याय देण्यासाठी अथक आणि प्रामणिक प्रयत्न केले. प्रत्येक गावात किमान एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची घडी बसलेली असतानाही लोकसभेसाठी विधानसभेचा राजीनामा दिला.आपण मांडलेला डाव मोडला.आता डाव पुन्हा सावरायचा असल्याचे सांगत भावनिक आवाहन लंके यांनी केले.

तालुक्यातील काही असंतुष्ट आत्मे लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. माझा तुमच्यावर व तुमचा माझ्यावर अधिकार आहे.लोकसभा निवडणुकीत आपण झेंडा लावणारच,आपले नाव देशात होणार आहे. धोका पत्करून आपण पुढे जात आहोत. समोरचा कडा पार करून झेंडा रोवायचा आहे.तालुक्यातील जनतेच्या हाती मताधिक्य आहे. किमान एक लाखांची आघाडी मिळाली पाहिजे. विरोधक इतर तालुक्यात जाऊन तालुक्यात लंके यांना लिड मिळणार नाही असा गैरसमज पसरवत आहेत कारण इतर तालुक्यातही त्यांना प्रतिसाद मिळत नाही असे आ.निलेश लंके म्हणाले.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!