हौसेला मोल नसतं, हे आगळ वेगळ खिल्लार गायीचं डोहाळं जेवण तुम्ही पहिला का ?

हौसाचे डोहाळे व ओटीभरण मोठ्या थाटामाटात पार पडले, जिच्या पोटी ३३ कोटी देव राहतात अश्या गोमातेचे डोहाळे व ओटीभरण कार्यक्रम होता याची जोरदार चर्चा झाली , माळेगांवात एका कुटुंबाने खिल्लार गायीचे केलेले डोहाळे जेवण कौतुकाचा विषय ठरले आहे. धंगेकर यांच्या गायीचं नाव हौसा असं आहे. हौसा नावाच्या गाईचे डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते.
अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती. बारामती तालुक्यातील माळेगांव येथे हा आगळा वेगळा समारंभ पार पडला. योगिता व नानासाहेब राणे यांनी आपली मुलगी सोनियाच्या विवाह प्रसंगी धंगेकर कुटुंबास जातीवंत खिल्लार गाईचे वासरु भेट दिले.या वासराची सोनिया व संग्राम धंगेकर,पती संग्राम,सासु मिना व सासरे सुर्यकांत धंगेकर यांनी गाईची मुलीप्रमाणे जोपासना केली.
तिचे हौसा असे नाव ठेवले. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात डोहाळे व ओटीभरण निमित्त तिला छान सजविले होते. अतिशय सुंदर पैठणी परीधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती.तसेच विविध पदार्थांचे रुखवत तयार केले होते. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट दिली. तसेच परिसरातील अनेक विधवांना हळदीकुंकू लावून सुवासिनींचा मान दिला. यानंतर उपस्थित सर्वांना प्रितीभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्याकडील असणाऱ्या पशुधनावरती जीवापाड प्रेम करून त्याला एखाद्या व्यक्तीप्रमाणे वागणं याला खऱ्या अर्थाने भूतदया म्हणतात या कुटुंबांना गोमातेच्या पद्धतीने हा सोहळा केला तो खऱ्या अर्थाने सर्वांसाठी आदर्शवत आहे आपल्याकडील पशुधनाला एखाद्या कुटुंबाचा सदस्य प्रमाणे जपणं ही आपली मराठी संस्कृती आहे