ऑस्ट्रेलियातून आलेली कारभारीन जेव्हा शेतातील भारा डोक्यावर घेते, व्हिडिओ व्हायरल..
फोरेन ची पाटलीन तुम्ही सर्वांनी पहिली मात्र ऑस्ट्रेलिया कारभारीण पाहा , हा व्हिडी यो पाहून आपण भारतीय आहोत याचा आपला मनोमन आनंद होईल.भारतीय संस्कृतीची भुरळ जगभरात सर्वांनाच आहे. याचमुळे परदेशी मुलींनी भारतीय मुलांशी लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय मुलांशी लग्न करुन भारतात सेटल होण्यासाठीही परदेशी मुली फार उत्सुक दिसतात.
भारतात आल्यानंतर इथली संस्कृती, रितीरिवाज, परंपरा जपण्यास त्यांना फार आवडते. ऑस्ट्रेलियातून आलेली कारभारीन भारतात येऊन चक्क शेताच्या बांधावर काम करताना दिसली.ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या कर्टनी नामक महिलेने भारतीय वंशाच्या हरियाणातील तरुणाशी विवाह केला. त्यानंतर ती आपला पती लवलीनसोबत हरियाणात आली.
कर्टनी लवलीनसोबत शेतावरुन गवताचं ओझं उचलून घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपली पत्नी आपल्यासोबत एवढी आनंदी आहे हे पाहून पतीला समाधान वाटत आहे त्यांनी हा व्हिडीयो इन्स्टा शेयर केला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मेरा भाग्य मिल गया’.. व्हिडिओमध्ये एका कपड्यात शेतातील कापलेला चारा बांधलेला दिसत आहे.
शेतावर फिरुन झाल्यानंतर कर्टनी हे गवताचं ओझं डोक्यावर उचलून शेतातून चालताना दिसत आहे. पती लवलीनने हा भारा डोक्यावर ठेवण्यासाठी कर्टनीला मदत करत आहे.हसतमुखाने कर्टनी शेतावर फिरण्याचा, मोकळ्या वातावरणाचा आनंद घेत आहे.